स्वरूपराव पाटील राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:52+5:302021-09-14T04:30:52+5:30

फोटो- शिगाव- शिगाव (ता. वाळवा) येथे स्वरूपराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट महाडिक यांनी सत्कार केला. या वेळी जगन्नाथ माळी, ...

Swarooprao Patil is an all-round personality in politics | स्वरूपराव पाटील राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

स्वरूपराव पाटील राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

फोटो- शिगाव- शिगाव (ता. वाळवा) येथे स्वरूपराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सम्राट महाडिक यांनी सत्कार केला. या वेळी जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, संग्रामसिंह पाटील आदी उपस्थित होते.

शिगाव : स्वरूपराव पाटील म्हणजे राजकारणातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत, असे प्रतिपादन भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सम्राट महाडिक यांनी केले.

शिगाव (ता. वाळवा) येथे स्वरूपराव पाटील यांच्या वाढदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सम्राट महाडिक म्हणाले की, गेली ४० वर्षे झाले ते राजकारण व समाजकारणात सक्रियपणे काम करत आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने वयाच्या अठराव्या वर्षी त्यांना पंचायत समितीचे सदस्य होण्याचा मान मिळाला. राजकीय पटलावर त्यांनी अनेक पदे सांभाळली. ते सांभाळत असताना अनेकांशी मतभेद देखील झाले; पण कोणाशी मनभेद कधी झाला नाही. त्यामुळे बाबूजींना राजकारणात एक आदराचे स्थान आहे.

स्वरूपराव पाटील यांना वाढदिवसानिमित्त सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खा. धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, संपतराव पाटील, रजनीताई पाटील, आ. अनिल बाबर, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, जिल्हा बँक संचालक सी. बी. पाटील, अशोकराव पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र बर्डे, पृथ्वीराज पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, सागर खोत, जयराज पाटील, जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी, सरगम मुल्ला, डॉ. क्रांतीकुमार पाटील, कमल दिनदयाल आदींसह मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Swarooprao Patil is an all-round personality in politics