भाजप जैन प्रकोष्ट उपप्रमुखपदी स्वप्निल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:14+5:302021-09-25T04:28:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : भाजप जैन प्रकोष्ट प्रदेशप्रमुखपदी संदीप भंडारी, तर उपप्रमुखपदी स्वप्निल शहा यांची नियुक्ती करण्यात ...

Swapnil Shah as BJP Jain Cell Deputy Chief | भाजप जैन प्रकोष्ट उपप्रमुखपदी स्वप्निल शहा

भाजप जैन प्रकोष्ट उपप्रमुखपदी स्वप्निल शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : भाजप जैन प्रकोष्ट प्रदेशप्रमुखपदी संदीप भंडारी, तर उपप्रमुखपदी स्वप्निल शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगलीचे विनोद पाटील यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड झाली आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याहस्ते निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, जैन समाज हा आर्थिकदृष्ट्या सधन समाज असून, देशाच्या आर्थिक क्षेत्रात मोठा वाटा आहे. सामाजिक क्षेत्रातही जैन समाजाचे योगदान मोठे आहे. हा समाज पहिल्यापासूनच भाजपसोबत आहे. राजकारणातील त्यांचा सहभाग वाढावा, यासाठी भाजपने स्वतंत्र जैन प्रकोष्टची निर्मिती केली आहे.

विरोधी पक्षनेते दरेकर यांच्याहस्ते स्वप्निल शहा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, कार्यालयीन मंत्री मुकुंद कुलकर्णी, चित्रा वाघ, राज के. पुरोहित, ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते.

Web Title: Swapnil Shah as BJP Jain Cell Deputy Chief