शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

By admin | Updated: September 22, 2014 00:55 IST

बैठकीत मागणी : जागा वाटपानंतरच भूमिका जाहीर करण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला

सांगली : राज्यात काय व्हायचे ते होऊदे, परंतु सांगलीत राष्ट्रवादीने स्वबळावर लढून कॉँग्रेसला त्यांची जागा दाखवून द्यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर माजी आमदार दिनकर पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांची कदर करण्यात येईल; परंतु राज्यातील जागा वाटप झाल्यानंतरच आमची भूमिका जाहीर करू, असे स्पष्ट केले. माजी मंत्री मदन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देतानाच दिनकर पाटील, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मदन पाटील यांच्याविरोधात मोहीम पुकारली आहे. त्यांच्यावर थेट टीका करताना सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणीही केली होती. सांगलीत नेमकी काय भूमिका घ्यावी, याचा कानोसा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक आज राष्ट्रवादी कार्यालयात बोलाविण्यात आली होती. बैठकीत सर्वच कार्यकर्त्यांनी ‘स्वबळाचा’ नारा दिला. राज्यात आघाडी झाली आणि विधानसभेसाठी काँग्रेसतर्फे मदन पाटील यांचे नाव जाहीर झाले तरीही कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मदत करणार नसल्याची ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली. सुरेश पाटील म्हणाले, राज्यात एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असताना येथील काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र आम्हाला राष्ट्रवादीची मदत नको असल्याचे जाहीर केले आहे. परंतु सांगलीकर मात्र सातत्याने काँग्रेसच्याच विरोधात असल्याचे लक्षात येईल. यंदा सांगलीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी मिळालीच पाहिजे. ज्या दादा घराण्याची २७ वर्षे सेवा केली, त्यांनाच आज आम्ही संधिसाधू वाटत आहोत. त्यामुळे आता स्वत:च्या ताकदीवर लढण्याची वेळ आली आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मनपा क्षेत्रात राष्ट्रवादीचे सोळा नगरसेवक आहेत, तर चार ग्रामपंचायती आपल्या ताब्यात आहेत. काँग्रेसने आम्हाला कमी लेखू नये. दिनकर पाटील म्हणाले, वसंतदादांच्या नावाने असलेल्या संस्था मोडून खाणाऱ्यांकडूनच सध्या दादांचे नाव घेऊन मतांचा जोगवा मागण्याचे कार्य सुरू आहे. परंतु सांगलीची जनता शहाणी आहे. भावनिक आवाहने केली म्हणजे मते मिळतील, या भ्रमात कोणी राहू नये. बॅँक कोणामुळे बुडाली त्यांची नावे जाहीर करण्यास इतका उशीर का होत आहे? सहकार मंत्र्यांनी बॅँकेच्या चौकशीस स्थगिती दिल्याने बेड्या पडलेल्या नाहीत. स्थगिती उठविल्यास सत्य बाहेर येईल. मदन पाटील यांच्या भोवताली असलेली सध्या जी चौकडी आहे, ती स्वत:चा स्वार्थ साधणारी आहे. स्वबळावर लढण्याची भूमिका पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या कानावर घातली जाईल. समजा आघाडी झाली आणि जागावाटपात कॉँग्रेसला ही जागा दिली गेली तर त्यानंतर आमची भूमिका जाहीर करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)