सामान्य कार्यकर्त्यांची विकासाला साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:55+5:302021-06-09T04:33:55+5:30

शिराळा : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक व मतदार संघात होत असलेली विकासकामे पाहून विरोधकांचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माध्यमातून ...

Support the development of ordinary workers | सामान्य कार्यकर्त्यांची विकासाला साथ

सामान्य कार्यकर्त्यांची विकासाला साथ

शिराळा : सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची धमक व मतदार संघात होत असलेली विकासकामे पाहून विरोधकांचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या माध्यमातून विकासाच्या प्रवाहात सहभागी होत आहेत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.

आरळा (ता. शिराळा) येथे आरळापैकी विठ्ठलवाडी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वसंत भाडुगळे व आरळ्याचे उपसरपंच सदाजी पाटील उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, मतदार संघाचे मी ज्या-ज्या वेळी नेतृत्व केले, त्या-त्या कालखंडात मोठ्या प्रमाणात विकास साधला आहे. गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारी सुरु आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरीही मतदार संघातील विकास थांबू दिलेला नाही. आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने सक्षम केल्या आहेत. वाकुर्डे बुद्रुक योजना, वारणा प्रोजेक्ट, रस्ते, महामार्ग, पाणी योजना आदीसाठी लाखो रुपयांचा निधी आणला आहे.

ते म्हणाले, चांदोली धरणग्रस्तांचे प्रश्न व चांदोली पर्यटन विकास या दोन अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व मी लक्ष दिले आहे. त्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पर्यटन विकास झाल्यावर या भागाचे रूप पालटणार आहे. रोजगार व व्यवसाय निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल.

कोंडिबा चौगुले यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे मानसिंगराव नाईक यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बडदे, बाबूराव कळंत्रे, फय्याज डांगे, सुजीत देशपांडे, प्रकाश पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Support the development of ordinary workers