शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृष्णाकाठ पणत्यांनी उजळला

By admin | Updated: November 15, 2016 00:32 IST

‘वीर जवान तुझे सलाम ! : ‘एक पणती जवानांसाठी’ उपक्रम; पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर

सांगली : ‘भारतमाता की जय’, ‘वीर जवान तुझे सलाम’, ‘वंदेमातरम्’ अशा जयघोषात आणि सामाजिक भान जपत सैनिकांच्या कृतज्ञतेपोटी लावलेल्या पणत्यांनी येथील कृष्णाकाठ सोमवारी सायंकाळी उजळून गेला. धीरगंभीर वातावरणात ‘वीर जवान तुझे सलाम! : एक पणती जवानांसाठी’ हा उपक्रम राबविण्यात आला. सांगलीकरांनी कृष्णाकाठावर गर्दी करत या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सीमेवर लढताना नुकतेच वीरमरण आलेले दुधगाव (ता. मिरज) येथील शहीद जवान नितीन कोळी यांच्या कुटुंबीयांच्याहस्ते पणती लावून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित सांगलीकरांनी सुरुवातीला वसंत स्फूर्तिस्थळ परिसरात पणत्या लावल्या. यावेळी ‘वीर जवान तुझे सलाम’ असा मजकूर लिहिलेल्या पणत्या प्रज्ज्वलित केल्यानंतर वातावरण धीरगंभीर बनले. यावेळी बोटीमध्ये पणत्यांच्या माध्यमातून अशोक चक्राची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. नदीमध्ये त्या पणत्या प्रज्ज्वलित करण्यात येत होत्या. शहीद नितीन कोळी यांच्या पत्नी संपदा कोळी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या पत्नी वंदना गायकवाड, शैलजा पाटील, ऐश्वर्या पाटील आदींनी बोटीतूनच माई घाटापर्यंत येत पणत्या प्रज्वलित केल्या. यानंतर उपस्थित नागरिकांच्या उपस्थितीत माई घाटावरही पणत्या लावण्यात आल्या. यावेळी पाण्यात सोडण्यात आलेल्या पणत्यांमुळे नदीपात्र आकर्षक दिसत होते. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, आयुक्त रवींद्र खेबूडकर, वंदना गायकवाड, आभाळमाया फाऊंडेशनचे प्रमोद चौगुले, एम. एस. राजपूत, नारायण उंटवाले, दत्ता पाटील, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष गोपाल मर्दा, शहीद नितीन कोळी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या उपक्रमाला प्रतिसाद त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी गायकवाड यांनी कृष्णाकाठ पणत्यांनी उजळविण्याचा उपक्रम हाती घेतला होता. शहरातील स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने गेला आठवडाभर या उपक्रमाचे नियोजन सुरू होते. सायंकाळच्या सुमारास संपूर्ण कृष्णाकाठ पणत्या आणि त्या प्रज्ज्वलित करण्यासाठी पुढे सरसावलेल्या सांगलीकरांच्या गर्दीने भरून गेला होता.