शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वीकेेंड लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शासन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वीकेेंड लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी सांगली जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी कडकडीत बंद पाळून शासन व जिल्हा प्रशासनाच्या कोरोना साखळी तोडण्याच्या प्रयत्नांना बळ दिले. शहरी भागांपासून छोट्या गावांपर्यंत सर्वत्र रस्ते, चौक, बाजारपेठा ओस पडल्या होत्या.

जिल्ह्यात शासनाने जाहीर सोमवार ते शुक्रवारपर्यंतच्या निर्बंधांबद्दल गेल्या काही दिवसांपासून व्यापारी व व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात असताना वीकेंड लॉकडाऊनला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाने व जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनमध्ये ज्यांना मुभा दिली, ते व्यवसायही बंद राहिले. रस्ते, चौक, बाजारपेठा शांत झाल्या. दिवसभर गावे, शहरे निर्मनुष्य असल्याचे भासत होती.

जिल्ह्यात वाळवा, शिराळा, मिरज, तासगाव, पलूस, कडेगाव, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, खानापूर या सर्व तालुक्यांमध्ये शांतता होती. शुक्रवारी रात्री आठ वाजता सुरू झालेला लॉकडाऊन सोमवारी सकाळपर्यंत कायम राहणार आहे. शुक्रवारी आठच्या ठोक्याला सर्व बाजारपेठा व व्यवसाय बंद झाले. संचारबंदीलाही तसाच प्रतिसाद लाभल्यामुळे शांतता दिसून आली. बस आणि रिक्षांसह खासगी प्रवासी आणि मालवाहतूक ठप्प होती.

शहरांसह छोटी छाेटी गावेही ओस पडल्याचे चित्र होते. नागरिक घराबाहेर न पडल्यामुळे पोलिसांवर फारसा ताण पडला नाही. जिल्ह्यात केवळ रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर्स, औषधांची दुकाने, एटीएम व पेट्रोलपंप सुरू होते. अन्य सेवा व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. शहरातील तसेच गावातील नेहमी गजबजणाऱ्या परिसरांमध्ये शुकशुकाट पसरला होता.

चौकटी

पेट्रोलपंपही ओस

नागरिकच घराबाहेर न पडल्याने अनेक पेट्रोलपंप ओस पडले होते. वाहनांच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांना दिवसभर थांबावे लागले. पोलीस व सरकारी कर्मचारी वगळता पेट्रोलपंपावरही कोणी फिरकले नाही.

चाैकट

भाजीपाला वाहतूकही ठप्प

भाजीपाला वाहतुकीस मुभा दिली असली तरी तीही शनिवारी होऊ शकली नाही. विक्रेत्यांनी स्वत:हून लाॅकडाऊनमध्ये सहभाग घेतला. याशिवाय इतर मालवाहतूक, प्रवासी वाहतूकही पूर्णपणे बंद राहिली. बसस्थानके भकास दिसत होती.