शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

पेठनाक्यावरील वादळ महामार्गावरच शमले!

By admin | Updated: October 2, 2014 00:17 IST

महाडिक गटाची माघार : इस्लामपूर मतदारसंघात चर्चा

अशोक पाटील -- इस्लामपूर  मतदारसंघात जयंत पाटील यांच्याविरोधात नानासाहेब महाडिक आणि त्यांचे चिरंजीव राहुल महाडिक यांनी पहिल्या टप्प्यात दंड थोपटले होते; तर शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी ताकद दाखविण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात पेठनाक्याचा दबदबा वाढला होता. परंतु अर्ज माघारीदिवशी दोन्ही मतदारसंघातील उमेदवारी अर्ज मागे घेत महाडिक गटाने लढण्यापूर्वी निवडणुकीतून एक्झिट घेतल्याचे स्पष्ट झाले. पेठनाक्यावरील वादळ महामार्गावरच शमल्याने आता इस्लामपूर मतदारसंघात सर्व काही शांत राहणार आहे. सहा महिन्यांपासून नानासाहेब महाडिक आणि राहुल, सम्राट महाडिक यांनी कसल्याही परिस्थितीत जयंत पाटील यांना आव्हान द्यायचेच, असा निर्धार करून मतदारसंघात चाचपणी सुरू केली होती. या तिघांनीही इस्लामपूर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. नानासाहेब महाडिक यांच्या रूपाने जयंत पाटील यांना तगडे आव्हान मिळेल, अशी चर्चा होती. खासदार राजू शेट्टी यांनीही महाडिक यांना पसंती देऊन सर्व ती मदत करण्याची तयारी दर्शवली होती.विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच नानासाहेब महाडिक यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न चालवले होते. यासाठी त्यांनी मातोश्रीवर ठिय्या मारला होता. परंतु शेवटपर्यंत त्यांच्या तिकिटाचा निर्णय न झाल्याने हताश होऊन परतावे लागले होते. त्यानंतर महाडिक पिता-पुत्रांनी इस्लामपूर व शिराळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच काँग्रेसच्यावतीने जितेंद्र पाटील, शिवसेनेतर्फे भीमराव माने, अपक्ष म्हणून अभिजित पाटील, बी. जी. पाटील यांनीही अर्ज दाखल करून एकास एक उमेदवार देण्याच्या प्रक्रियेला खो घातला. त्यामुळे महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेणे पसंत केल्याचे सांगितले जाते.निवडणुकीतील चुरस कमीनेहमी शिवाजीराव नाईक यांच्या पाठीशी असणाऱ्या नानासाहेब महाडिक यांनी गत निवडणुकीत मानसिंगराव नाईक यांना मदत केली होती, तर इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांना सहकार्याची भूमिका घेतली होती. राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेचा शब्द देऊन चकवले होते. याचा राग मनात ठेवून यावेळची निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेल्या महाडिक यांनी लढाईवेळी तलवार म्यान करून निवडणुकीतील रंगत कमी केली आहे. दरम्यान, शिराळा मतदारसंघातील सम्राट महाडिक यांचाही अर्ज मागे घेण्यात आला आहे. ते आता कोणाला मदत करणार, याकडे शिराळा मतदारसंघाचे लक्ष लागून राहिले आहे.