शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या मोटारी २५ पर्यंत सुरू

By admin | Updated: November 15, 2016 23:44 IST

मुख्यमंत्र्यांचे आदेश : गोपीचंद पडळकर यांची माहिती; आटपाडी तालुक्यात लाभ

आटपाडी : टेंभू योजनेच्या मोटारी दि. १५ रोजी बंद न करता आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी शुक्रवार दि. २५ नोव्हेंबरपर्यंत त्या सुरू ठेवाव्यात, अशी आणखी १0 दिवसांची वाढ करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्याची माहिती भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली. आटपाडी तालुक्यात पावसाअभावी सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आणखी भयानक होऊ नये यासाठी टेंभू योजनेचे पाणी ओढे आणि तालुक्यातील तलावांतून सोडण्यात आले आहे. मात्र कौठुळी, बोंबेवाडी, देशमुखवाडी, आंबेवाडी, खवासपूर, लोटेवाडी या गावांना या पाण्याचा लाभ होण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी या गावांतील ग्रामस्थांनी केली होती. या गावांतील ग्रामस्थांनी प्र्रसंगी येणाऱ्या जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. या गावांतील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर निंबवडे तलावातून विठलापूर येथील ओढ्यामार्गे माणगंगा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. माणगंगा नदीत पाणी पोहोचेपर्यंत मंगळवार दि. १५ पासून टेंभूच्या मोटारी बंद करण्यात येणार होत्या. या गावांतील ग्रामस्थांनी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना भेटून सोमवारी विनंती केली होती. (वार्ताहर) मुंबईत चर्चा : पाटबंधारे मंत्र्यांच्या सूचना मंगळवारी गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभूच्या मोटारी आणखी १0 दिवस चालू ठेवण्यात याव्यात अशी विनंती केली. तसे निवेदनही दिले. मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ तसे आदेश दिले. मंत्री महाजन यांची पडळकर यांनी भेट घेतली. तेव्हा सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गुणाले तिथे होते. महाजन यांनी त्यांना आणखी १0 दिवस टेंभू योजना सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे सांगून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.