जत शहरासह तालुक्यात स्वयंस्फूर्त बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:25 IST2021-04-11T04:25:48+5:302021-04-11T04:25:48+5:30

जत : जत शहरासह तालुक्यात व्यापारी व इतर व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवहार स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ ...

Spontaneous closure in talukas including Jat city | जत शहरासह तालुक्यात स्वयंस्फूर्त बंद

जत शहरासह तालुक्यात स्वयंस्फूर्त बंद

जत : जत शहरासह तालुक्यात व्यापारी व इतर व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवहार स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवले आहेत. त्यामुळे शहरातील मंगळवार पेठ परिसरात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

शनिवारी जत बाजारपेठ बंद असते. कोणतेही दैनंदिन व्यवहार होत नाहीत. लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही दैनंदिन व्यवहार सुरू नव्हते. खासगी प्रवासी वाहतूक, एसटी बस वाहतूक व इतर व्यवहार पूर्णपणे बंद होते. त्यामुळे तुरळक सुरू असणारे दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले होते. नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांनी घरात थांबून लाॅकडाऊनला पाठिंबा दिला आहे. जत शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एरव्ही गजबलेल्या मंगळवार पेठ, महाराणा प्रताप चौक, वाचनालय चौक, गांधी चौक परिसरात संपूर्ण दिवसभर शुकशुकाट जाणवत होता.

फोटो मेल केला आहे.

Web Title: Spontaneous closure in talukas including Jat city