शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टमध्ये होणार दीड लाख बियांची पेरणी--

By admin | Updated: June 5, 2015 00:19 IST

डॉल्फिन ग्रुपचा उपक्रम : वन संरक्षक समिती सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग पर्यावरण दिन विशेष

नरेंद्र रानडे - सांगली -मागील काही वर्षांपासून येथील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जिल्ह्यातील ठराविक भागात बियारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा २ आॅगस्ट रोजी सागरेश्वर, चांदोली, दंडोबा परिसरात सुमारे दीड लाख विविध प्रकारच्या बियांची पेरणी करण्यात येणार आहे. पर्यावरण समतोलासाठी झाडांची गरज असते. मात्र ‘सर्व काही शासनाने करावे आणि आपण शांत चित्ताने बसावे’ ही जनमानसात रुजलेली वृत्ती नाहीशी व्हावी, यासाठी बिया संकलन आणि रोपणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दिवसेंदिवस वृक्षांची संख्या वेगाने कमी होत आहे. परिणामी सर्वांनाच ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दैनंदिन जीवनात आपण नानाविध प्रकारची फळे खातो आणि नंतर त्यातील बिया कचऱ्यात फेकून देतो. या वाया जाणाऱ्या बियांचा उपयोग व्हावा, या उद्देशाने ‘डॉल्फिन’तर्फे २००३ पासून बिया संकलनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये सहभागी होणाऱ्यांना, त्यांनी संकलित केलेल्या बियांची माहिती सविस्तर लिहून देणे आवश्यक असते. प्रतिवर्षी राज्यातील वृक्षप्रेमी बिया संकलनाच्या या महत्त्वाच्या उपक्रमात सहभागी होतात, परंतु सर्वच बिया या पश्चिम महाराष्ट्राच्या हवामानात रुजत नाहीत. याकरिता केवळ आपल्याकडे जी झाडे येऊ शकतील, अशा बिया वेगळ्या काढण्यात येतात व त्या बियांची पेरणी जिल्ह्यातील विविध भागात करण्यात येते. बाकीच्या बिया संबंधित जिल्ह्यातील स्पर्धकांकडे परत पाठविण्यात येऊन त्यांची पेरणी त्या-त्या स्थानिक भागात केली जाते.तेरा वर्षांपासून प्रयत्न‘डॉल्फिन’च्या माध्यमातून मागील तेरा वर्षांच्या कालावधित राज्यातून सुमारे १० लाख विविध बिया संकलित करून त्यांची विविध भागात पेरणी करण्यात आली आहे.