शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘सामाजिक न्याय’चा निधी तीर्थदर्शन योजनेला वर्ग, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 

By अविनाश कोळी | Updated: July 19, 2024 18:34 IST

शिष्यवृत्ती थकीत, निर्णय मागे घेण्याची मागणी

सांगली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जातीचा निधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, वारकरी महामंडळ स्थापना आणि दिंडी करिता वळविला आहे. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटन प्रमुख अमोल वेटम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १४ जुलै रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्ष वय व त्यावरील जेष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याबाबतही परिपत्रक काढण्यात आले.मुळातच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हा अनुसूचित जाती, मागासवर्गीय यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रगती करिता स्थापन केला आहे. यातील पैसे हे विद्यार्थी हितार्थ वापरणे गरजेचे आहे. वारकरी महामंडळ आणि तीर्थस्थळ, दिंडी यात्रेचा सामाजिक न्याय विभागाशी काडीमात्र संबंध नसताना सामाजिक न्याय विभागाने परिपत्रक काढून निधी वळविला आहे.

कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्याप्रमाणे स्वतंत्र बजेटचा कायदा तसेच अनुसूचित जातीचा निधी इतरत्र न वळविण्याबाबत कायदा केलेला आहे. हा कायदा महाराष्ट्र सरकारने पारित करावा, अशी मागणी देखील होत आहे. सामाजिक न्याय विभागाचा जवळपास २३ हजार कोटीहून अधिक निधी २०१० पासून इतरत्र वळविण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती थकीतअनुसूचित जाती विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती थकीत आहेत. प्रलंबित फेलोशिप करिता पी.एचडीचे विद्यार्थी हे भर पावसात लॉंग मार्च काढत मुंबईत दाखल झाले आहेत. अत्याचारग्रस्त पीडितांना निधी नाही. हॉस्टेल दुरवस्था, अंतरजातीय योजनेला निधी नाही. परदेशी शिष्यवृत्ती थकीत आहे. त्याबाबत निर्णय घेऊन स्कॉलरशिप मर्यादा वाढून ८ लाख करावी, स्वतंत्र बजेट कायदा करावा, अशी मागणी वेटम यांनी केली.

टॅग्स :Sangliसांगलीfundsनिधीtourismपर्यटनScholarshipशिष्यवृत्ती