शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

पतंगरावांनी घसरुन पडण्यापेक्षा सावरावं !

By admin | Updated: May 3, 2015 00:57 IST

जयंत पाटील : सहकार खात्याचा गैरवापर केला

नेवरी : जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या लोकनियुक्त संचालकांना अधिकारापासून दूर ठेवण्यासाठी सहकार खात्याचा गैरवापर करून बॅँकेवर व बाजार समितीवर प्रशासक नेमले गेले. शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेल्या बॅँकेमध्ये पक्षीय राजकारण नको. आम्ही समविचारी लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहोत. टीका टिप्पणी करून सारखे घसरणे आम्हाला शोभत नाही. घसरून पडणे आम्हाकडून होत नाही. त्यामुळे तुम्ही पडू नका, अशी टीका शेतकरी सहकार पॅनेलचे नेते आमदार जयंत पाटील यांनी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. रायगाव (ता. कडेगाव) येथे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शेतकरी सहकार पॅनेलची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख अध्यक्षस्थानी होते. जयंत पाटील म्हणाले की, आम्ही सुरुवातीपासून सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; परंतु काही मंडळींनी सवतासुभा मांडल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे जागा देणे शक्य नव्हते. विरोधकांना प्रत्यक्षात सत्ता मिळविणे शक्य नव्हते. सारखेसारखे बोलून घसरण्यापेक्षा व घसरून पडण्यापेक्षा विरोधकांनी थोडे स्वत:ला सावरायला हवे, अशी बोचरी टीका पाटील यांनी डॉ. पतंगराव कदम यांचे नाव न घेता केली. खासदार संजय पाटील म्हणाले की, चांगल्या विचाराने काम करणारे लोक बँकेत आले पाहिजेत. शेतकरी सहकार पॅनेल पूर्णपणे पक्षविरहित आहे. यावेळी संग्रामसिंह देशमुख यांनी मजूर संस्थांची ई-टेंडर प्रणाली, व्हॅट, आयकर, आदी प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी केली. बिनविरोध निवडून आलेल्या दिलीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. विलासराव शिंदे, अरुणअण्णा लाड, लालासाहेब यादव, प्रा. सिकंदर जमादार आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मजूर फेडरेशनचे माणिकराव जाधव, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, धोंडीराम महींद, सौ. कमल पाटील, सौ. श्रद्धा चरापले, सुरेश पाटील, बी. के .पाटील, विष्णू माने, चंद्रकांत हाक्के, बाळासाहेब होनमोरे, चंद्रसेन देशमुख, दत्तूशेठ सूर्यवंशी उपस्थित होते. सतीश देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)बाजार समितीवर जाणूनबुजून प्रशासक लोकनियुक्त संचालकांना त्यांनी काम करू न देता कामापासून व अधिकारापासून दूर ठेवले. मध्यंतरी बँकेवर प्रशासक असल्यामुळे अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत करू शकलो नाही. आमच्यासमोर जे पॅनेल आहे, त्यांना उमेदवारही देता आले नाहीत. त्यांना तत्त्वाची, विचारांची जोड नाही. वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी निवडणूक लढविणाऱ्यांचा निर्णय मतदारांनी घ्यावा.