शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत लाॅकडाऊन विरुद्ध दुकानदारांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST

मिरज : दुकाने व व्यापार बंदमुळे मिरजेतील प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट आहे. व्यापार बंदविरोधात मिरजेतील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी मार्केट चाैकात निदर्शने ...

मिरज : दुकाने व व्यापार बंदमुळे मिरजेतील प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट आहे. व्यापार बंदविरोधात मिरजेतील व्यापाऱ्यांनी लक्ष्मी मार्केट चाैकात निदर्शने केली. आ. सुरेश खाडे यांनीही आंदोलनाचा इशारा दिल‌ा आहे. गुरुवारी तिसऱ्यादिवशीही शहरात व ग्रामीण भागात दुकाने व व्यवहार बंद होते.

प्रशासनाकडून लाॅकडाऊनच्या कठोर अंमलबजावणीमुळे मिरज शहरातील हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यापारी, फेरीवाले, हातगाडीवाले, भाजी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद आहे. शहरात फळविक्रेते वगळता इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाडीचालकांना प्रतिबंध केला असल्याने मार्केट परिसरातील रस्ते मोकळे आहेत.

आ. सुरेश खाडे यांनी दुकाने सुरू करण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र लाॅकडाऊनबाबत प्रशासनाचा कठोर पवित्रा असल्याने व्यापाऱ्यांवरील निर्बंध कायम आहेत. व्यापारी संघटनेनेही गुरुवारपर्यंत प्रशासनाने लॉकडाऊन न हटविल्यास निर्बंध झुगारुन व्यापारी दुकाने सुरू करण्याचा इशारा दिला होता. व्यापाऱ्यांनी लक्ष्मी मार्केट परिसरात निदर्शने करून व्यापार सुरू करण्याची मागणी केली.

राष्ट्रवादी नगरसेवकांनीही लाॅकडाऊनला विरोध केला आहे. मिरजेत अनेक दुकाने व हाॅटेलवर महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केल्यानेही व्यापाऱ्यांसोबत वादावादीचे प्रकार सुरू आहेत.

शहरातील मार्केटसह किसान चौक, टाऊन हॉल, लक्ष्मी मार्केट परिसर, हिंदमाता चौक, लोणी बाजार रस्ता, दत्त चौक परिसरात खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विक्रीच्या हातगाड्या, भाजी विक्रेत्यांना पिटाळण्यात आले आहे.

मिरजेसह ग्रामीण भागात मालगाव, आरग, बेडग, म्हैसाळ यासह पूर्व भागातील अनेक गावांतही लाॅकडाऊनमुळे व्यवहार बंद आहेत. वाईन व लिकर शॉप बंद असल्याने परमिट रूम व बारमध्ये दारू खरेदीसाठी तळीरामांची झुंबड आहे.

चाैकट

बाजार रस्त्यावर

लोणीबाजार परिसरात मात्र भाजीविक्रेते निर्बंध झुगारून रस्त्यावर ठाण मांडत असल्याने त्यांना हटविण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.