शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिवाजीराव नाईक यांचा लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 19:03 IST

मतदारसंघाच्या विकासासाठी निर्णय : प्रवेशाबाबत निशिकांत पाटील यांचा मोठा वाटा

विकास शहाशिराळा : जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा विधानसभा निवडणुकीपासून रंगल्या आहेत. त्यातच मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक हे त्यांच्या भूमिकेची वाटत पाहात होते. यामुळे पहिले आप, पहिले आपच्या नादात पक्षप्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेत शिवाजीराव नाईक यांनी अजितदादा सक्षम आहेत. त्यामुळे विकासकामे होतील, असे सांगत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाबाबत निर्णय घेतला आहेत. यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे.आता शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे पुन्हा बदलली आहेत. शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादीत त्यांच्याबरोबर जुने मित्र तीन माजी आमदार घेऊन जात आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही बदल होणार आहे. माजी राज्यमंत्री नाईक यांनी १९९५ मध्ये शिवाजीराव देशमुख यांच्याशी फारकत घेऊन फत्तेसिंगराव नाईक यांच्याशी युती करून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली. यात ते यशस्वी झाले होते. त्यावेळी जिल्ह्यातील अपक्ष आमदार यांची मोट बांधून राज्यमंत्री म्हणून युती शासनात सहभागी झाले होते. यानंतर पुन्हा देशमुख गट, भाजप, मानसिंगराव नाईक गट असा राजकीय प्रवास झाला. यादरम्यान शिवाजीराव नाईक यांच्या संस्थाही अडचणीत आल्या होत्या. यातूनच मानसिंगराव व शिवाजीराव नाईक गट एकत्र आला होता. विधानसभा निवडणुकीपासून जयंतराव पाटील, मानसिंगराव नाईक, शिवाजीराव नाईक यांच्या विविध पक्षात प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र शिवाजीराव नाईक यांनी यात आघाडी घेऊन राज्याची आर्थिक दोरी असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याबरोबर माजी आमदार राजेंद्र देशमुख, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार अजितराव घोरपडे हेही बरोबर आहेत. या प्रवेशात निशिकांत पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी ही बैठक घडवून आणली. येत्या आठ-दहा दिवसांत मुंबईत हा प्रवेश होणार आहे. यानंतर सांगली येथे कार्यक्रम होणार असून यामध्ये आणखी अनेक नेते प्रवेश करणार आहेत. आमदार सत्यजित देशमुख, भाजप नेते सम्राट महाडिक यांच्याबरोबर शिवाजीराव नाईक यांची पुन्हा राजकीय वाटचाल कशी असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अजितदादा सक्षम आहेत. त्यांच्याबरोबर जाण्याबाबत या अगोदर बैठका झाल्या होत्या. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची तसेच मतदारसंघातील विकासकामे अडणार नाहीत. मानसिंगराव नाईक हे बाहेर आहेत. त्यामुळे ते आल्यावर त्यांना याबाबत सांगणार आहे. मानसिंगराव यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंतराव पाटील यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ते काय करणार हे मला सांगता येणार नाही. अजून अनेक नेतेमंडळी आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे ही लवकरच समजतील. - शिवाजीराव नाईक, माजी राज्यमंत्री

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारShivajirao Naikशिवाजीराव नाईक