शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

शेळी-मेंढी छावण्यांची घोषणा ठरणार मृगजळ -जत तालुक्यातील परिस्थिती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:04 IST

शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला

ठळक मुद्देपशुपालकांना करावी लागते तारेवरची कसरत

गजानन पाटील ।संख : शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा आदेश ३१ मे रोजी महसूल व वन विभागाने दिला होता. याला पंचवीस दिवस उलटून गेले तरीही जत तालुक्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावणी सुरू झालेली नाही. त्या सुरु होतील का, असा प्रश्न पशुपालकांना पडला आहे.

जत तालुक्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळ्या-मेंढ्यांचे पालन केले जाते. तालुक्यामध्ये शेळ्यांची संख्या १ लाख ३० हजार ३९५ आहे. शेळीबरोबर मेंढीपालन हा व्यवसाय केला जातो. तालुक्यात मेंढ्यांची संख्या ७७ हजार ९७६ आहे. मात्र चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ आली आहे. मान्सून व अवकाळी पाऊस न झाल्यामुळे भीषण अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. रानातील खुरट्या गवताची उगवण झाली नाही. चाºयासाठी जनावरांना रानोमाळ वणवण भटकंती करावी लागत आहे.

पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर दुष्काळी दौºयावर आले असताना, पशुपालकांनी शेळया-मेंढ्यांसाठी चारा छावणी सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानंतर दुष्काळग्रस्त आठ जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने पावसाच्या तोंडावर घेतला. पशुसंवर्धन विभागाने पशुगणनेची माहिती वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली होती, मात्र फक्त मोठ्या जनावरांसाठी छावण्या सुरू झाल्या. लहान जनावरांचा विचार झाला नाही.

शेळ्या-मेंढ्या छावणीचा मुद्दा सर्वप्रथम २०१० मध्ये चर्चेत आला होता. त्यावेळी सरकारने प्रतिजनावरावर पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम फारच तोकडी असल्याने त्यावेळी लहान जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या नाहीत. २०१२ व २०१५ मध्येही मोठ्या जनावरांच्या छावण्या सुरु झाल्या, मात्र त्यावेळेसही शेळ्या-मेंढ्यांच्या छावण्यांची चर्चा झाली नाही. आता तब्बल नऊ वर्षानंतर त्यांच्या छावण्यांना मंजुरी दिली आहे. प्रति जनावरावर मिळणारे अनुदान वाढवून पंचवीस रुपये केले. परंतु पाऊस सुरू झाल्यानंतर आठ ते दहा-पंधरा दिवसात चारा उपलब्ध होईल. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असला तरी तो फसवा आहे, असे पशुपालकांचे म्हणणे आहे.छावणीचालकांना : न परवडणाºया अटीशेळ्या-मेंढ्यांसाठी प्रतिदिन २५ रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केले. ओला चारा, वाळलेला चारा, पशुखाद्य मुरघास हे त्यातच देणे छावणी चालकांना परवडणारे नाही. ऊस व उसाचे वाडे हिरवा चारा म्हणून देऊ नये, अशी अट सरकारने छावणीचालकांना घातली आहे. हिरवा चारा म्हणून देण्यासाठी मुरघास हा एकच पर्याय आहे. तो सहजासहजी मिळणे कठीण आहे.

प्रतिकूल स्थितीचाºयाचा अभाव, वाढती उष्णता, पाणी समस्या यामुळे शेळ्या-मेंढ्यांच्या गर्भपाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीमुळे गर्भधारणा होत नसल्याचे चित्र आहे. 

पावसाला सुरुवात झाल्यास पंधरा दिवसांत लहान जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याची स्थिती आहे. शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचे जाहीर केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर हा निर्णय घेतला. जनावरे जगविणे अवघड झाले आहे. चारा छावणीचा निर्णय फक्त नादी लावण्यासाठी आहे.- विठ्ठल कटरे, मेंढपाळ, तिल्याळ

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजना