बोरगाव हाणामारीतील सदस्य मृत्यूप्रकरणी सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:26 AM2021-03-06T04:26:34+5:302021-03-06T04:26:34+5:30

बोरगावच्या ३९ जणांवर तसेच मणेराजुरी येथील २० ते २५ अनोळखी संशयितांवर काळे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये ...

Seven arrested in Borgaon riots | बोरगाव हाणामारीतील सदस्य मृत्यूप्रकरणी सात जणांना अटक

बोरगाव हाणामारीतील सदस्य मृत्यूप्रकरणी सात जणांना अटक

Next

बोरगावच्या ३९ जणांवर तसेच मणेराजुरी येथील २० ते २५ अनोळखी संशयितांवर काळे यांच्या खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार महिलांचा समावेश आहे. याबाबत पांडुरंग काळे यांचे भाऊ अंकुश काळे यांनी कवठेमहांकाळ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बोरगाव येथे गुरुवारी उपसरपंच निवड होती. यावेळी आमदार सुमनताई पाटील आणि खासदार संजयकाका पाटील यांच्या गटात जोरदार हाणामारी झाली होती. यात पांडुरंग काळे यांना काठ्याने जबर मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही गटांकडील आठ ते दहा कार्यकर्ते जखमी झाले होते.

कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणी बोरगाव येथील भाजपचे तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील, माजी सरपंच नितीन मधुकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पोपट पाटील, सुजीत वसंत पाटील, अनिल ज्ञानदेव शिंदे, संतोष शंकर पाटील, रोहित पोपट शिंदे, राहुल पोपट शिंदे, प्रदीप तानाजी शिंदे, प्रवीण जनार्दन पाटील, अमोल दिलीप पाटील, युवराज आनंदराव पाटील, प्रकाश वसंत पाटील, आप्पासाहेब वसंत पाटील, सचिन वसंत पाटील, अभिनव जनार्दन पाटील, विकास जनार्दन पाटील, नंदकुमार मधुकर पाटील, प्रतीक नितीन पाटील, तुकाराम उत्तम पाटील, किसन हंबीरराव शिंदे, बटू शिंदे, अविनाश मधुकर यमगर, ज्योतिराम राजाराम पवार, महेश दत्तात्रय पाटील, अमित पोपट पाटील, रमेश संभाजी जाधव, जितेंद्र बाळासाहेब पाटील, पोपट शिवाजी पाटील, अलका वसंत पाटील, रोहिणी संतोष पाटील, दशरथ एकनाथ पाटील, प्रशांत नंदकुमार पाटील, अमित पोपट पाटील, विनायक भास्कर पाटील, स्मिता नितीन पाटील, अलका दिलीप पाटील (सर्व रा. बोरगाव), तर तासगाव तालुक्यातील योगेश प्रकाश पवार, अविनाश संभाजी पवार, संभाजी तुकाराम पवार यांच्यासह २० ते २५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

चाैकट

गावात प्रचंड तणाव

बोरगाव गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. गावात वातावरण प्रचंड तणावपूर्ण आहे. कवठेमहांकाळ पोलीस या हाणामारीतील संशयितांना पकडण्यासाठी धावपळ करीत आहेत. अद्याप फरार संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात खळबळ माजली आहे.

Web Title: Seven arrested in Borgaon riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.