शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

दहापेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्ह्यातील शाळा होणार बंद

By admin | Updated: June 4, 2015 00:02 IST

शिक्षण समिती बैठक : विद्यार्थी, शिक्षकांचे समायोजन

सांगली : जिल्हा परिषद शाळेतील जे शिक्षक संगणक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत, त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय बुधवारी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच ज्या शिक्षकांना वेतनवाढ दिली असेल, त्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, तेथील शाळा बंद करून त्याठिकाणचे शिक्षक व विद्यार्थ्यांचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण समितीची बैठक उपाध्यक्ष तथा समिती सभापती लिंबाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आरटीई निकषानुसार जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दहापेक्षा कमी पटसंख्या आहे, त्या शाळा बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी समितीसमोर ठेवला. त्यानुसार जिल्ह्यातील दहापेक्षा कमी पटसंख्येच्या ११ जिल्हा परिषद शाळा बंद करून तेथील विद्यार्थी आणि बावीस शिक्षक नजीकच्या एक किलोमीटर अंतरावरील शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घेण्यासाठी शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम राबविण्याची सूचनाही लिंबाजी पाटील यांनी दिली. तसेच ज्या प्राथमिक शिक्षकांनी संगणक शिक्षण घेतलेले नाही, त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णयही समितीत घेण्यात आला. संगणक परीक्षा उत्तीर्ण नसतानाही काही शिक्षकांना वेतनवाढ दिली आहे, त्यांच्या पगारातून ती रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तातडीने ही कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना वेतनवाढीपासून वंचित राहावे लागणार आहे. बैठकीस सदस्य रणजित पाटील, सुहास शिंदे, स्नेहल पाटील, भाऊसाहेब पाटील, राजेंद्रकुमार पाटील, मीनाक्षी महाडिक, पवित्रा बरगाले आदी सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)जत तालुक्यात १५८ पदे रिक्तजत तालुक्यात शिक्षकांची सर्वाधिक १५८ पदे रिक्त असल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळली आहे. म्हणून रिक्त पदे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच भरावीत, अशी जोरदार मागणी सदस्यांनी केली. त्यानुसार लिंबाजी पाटील यांनी, अन्य जिल्ह्यातून येणारे शिक्षक प्रथम जतला दिले जातील, असे आश्वासन दिले.जिल्ह्यातील बंद होणाऱ्या शाळाजत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देवनगर (वाळेखिंडी), कचरे- मासाळ वस्ती (बाज), नरळे पाटील वस्ती (सोरडी), धमाळ वस्ती, कोणबगी, तासगाव तालुक्यातील मोरे-पाटील-ठोंबरे वस्ती (शिरगाव), गणेशनगर - बोरगाव, रेवणगंगा मळा - बोरगाव, भवानी वस्ती सावर्डे, पवार वस्ती-मणेराजुरी आदी ११ शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील विद्यार्थी आणि २२ शिक्षकांचे नजीकच्या शाळेत समायोजन होणार आहे.