शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत शेरी नाला जलवाहिनीला पुन्हा गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:26 IST

संजयनगर : सांगली शहरातून धुळगाव (ता. मिरज) येथे जाणाऱ्या शेरी नाल्याच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. जुना बुधगाव रस्त्यावरील ...

संजयनगर : सांगली शहरातून धुळगाव (ता. मिरज) येथे जाणाऱ्या शेरी नाल्याच्या जलवाहिनीला पुन्हा गळती लागली आहे. जुना बुधगाव रस्त्यावरील गायत्रीनगर येथे जलवाहिनीस गेल्या आठ दिवसांपासून गळती लागल्याने परिसरातील घरांमध्ये व अंगणात पाणी शिरले आहे.

पाण्याचा निचरा व्हावा म्हणून परिसरातील नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांकडे पाठपुरावा केला; परंतु याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. दुसऱ्या बाजूला या समस्येबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही कोणी दाद घेत नाहीत असे स्थानिक नगरसेवक सांगत असल्याने नागरिकांची गोची झाली आहे. मोठ्या प्रमाणात डासांची वाढ होत असून, साथीच्या आजारांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. शहरांमध्ये सर्वत्र स्वच्छता अभियान राबविले जात असताना या ठिकाणी मात्र स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत.

चाैकट

आंदोलनाचा इशारा

या भागात काँग्रेस आणि भाजपचे प्रत्येकी दोन नगरसेवक आहेत. त्यांनी या भागाकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. येत्या आठ दिवसांमध्ये सांडपाण्याचा निचरा न झाल्यास महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

फोटो ओळ : सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील गायत्रीनगरमध्ये शेरी नाल्याच्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साठले आहे.

छाया : सुरेंद्र दुपटे