सांगलीत एकास प्लॅटवर कब्जा करीत जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:25 IST2021-05-24T04:25:10+5:302021-05-24T04:25:10+5:30

सांगली : शहरातील कोल्हापूर रोड परिसरातील एकाच्या प्लॅटवर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवीत त्यास ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी ...

In Sangli, one person was captured and threatened with death | सांगलीत एकास प्लॅटवर कब्जा करीत जिवे मारण्याची धमकी

सांगलीत एकास प्लॅटवर कब्जा करीत जिवे मारण्याची धमकी

सांगली : शहरातील कोल्हापूर रोड परिसरातील एकाच्या प्लॅटवर बेकायदेशीरपणे कब्जा मिळवीत त्यास ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी प्रतीक सुरेश भोसले (वय २९, रा. रागसुंदर अपार्टमेंट, पत्रकारनगर, सांगली) यांनी सहा जणांविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयितांनी फ्लॅटवर कब्जा मिळविताना प्रतीक यांचे १५ हजारांचे साहित्यही चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यात सचिन सुभाना भोसले (रा. कोल्हापूर रोड, सांगली), इसान दानवडे (जामवाडी, सांगली), सोनू सर्जेराव दुधाळ (अभयनगर), प्रशांत विश्वनाथ कदम (रा. खणभाग, सांगली), सागर अजित पाटील (शिवाजीनगर, आष्टा) आणि अतुल संजय पाटील (रा. कारंदवाडी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी भोसले पत्रकारनगरमध्ये राहण्यास आहेत. शुक्रवार, दि. २१ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास संशयितांनी येत फ्लॅटमध्ये सामान ठेवले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली व तेथील १५ हजार रुपये किमतीचे संगणकाचे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले असून, साक्षीदार तपासून पुढील तपास सुरू केला आहे.

Web Title: In Sangli, one person was captured and threatened with death