शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली महापालिकेत सत्ताधारी भाजप काँग्रेसला देणार सभापतिपद, नेमकं कारण काय.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 17:53 IST

पदाधिकाऱ्यांचा विरोध, आज निवडीची सभा

सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीसह विषय समित्यांच्या सभापतींची उद्या, शुक्रवारी निवडी होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी काँग्रेसला एका प्रभाग समितीचे सभापतिपद देण्याच्या हालचाली सुरू आहे. सत्ताधारी भाजप व काँग्रेस नेत्यामध्ये दिवसभर खलबते सुरू होती. पण विरोधकांना पद देण्यास महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत त्यावर तोडगा निघाला नाही.

महापालिकेच्या स्थायी समिती, महिला बालकल्याण, समाजकल्याण समिती व चार प्रभाग समित्यांच्या सभापतींची निवडीसाठी उद्या सभा बोलाविण्यात आली आहे. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत स्थायी समिती, समाजकल्याण व प्रभाग समिती ३ च्या सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

या तिन्ही सभापतिपदासाठी विरोधी काँग्रेसने अर्ज दाखल केलेले नाही तर महिला बालकल्याण व उर्वरित तीन प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी महापौर, उपमहापौर निवडीही काँग्रेसने बिनविरोध केल्या होत्या. त्यामुळे आताच्या निवडी बिनविरोध व्हाव्यात, यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

गुरुवारी दिवसभरात भाजपचे नेते सुरेश आवटीसह नेत्यांनी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसने प्रभाग समिती एकचे सभापतिपद देण्याची मागणी केली. त्या बदल्यात इतर सभापतीच्या निवडी बिनविरोध करण्याची तयारी दर्शविली पण त्याला महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे.

काँग्रेसमधील काही नगरसेवकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. सर्वच विषय समितीत भाजप व राष्ट्रवादीचे बहुमत आहे. त्यामुळे विरोधकांना सभापतिपद कशासाठी द्यायचे, असा प्रश्न भाजपचा नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे तरीही भाजपच्या नेत्यांनी मात्र बिनविरोधसाठी काँग्रेसला एक सभापतिपद देण्याची तयारी चालविली आहे. त्यावर दिवसभरात बरीच खलबते झाली. पण निर्णय होऊ शकला नाही. आता उद्या शुक्रवारी पुन्हा सकाळी त्यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, सभापती निवडीची प्रक्रिया सकाळी अकरा वाजता सुरू होईल. तोपर्यंत दोन्ही पक्षांचा निर्णय होणार आहे.

प्रभाग समितीच्या रचनेत बदल

प्रभाग समितीत भाजपचे वर्चस्व कायम रहावे, यासाठी यंदा बदल करण्यात आले. प्रभाग १६ हा प्रभाग समिती दोनमध्ये जोडला गेल्या. नैसर्गिक न्यायाने प्रभाग १६ हा प्रभाग समिती एकमध्येच हवा होता, असा दावा काँग्रेसने केला आहे. जनतेनेच भाजपला एका प्रभाग समितीत बहुमत दिलेले नाही. केवळ तोडफोड करून सत्तेच्या जीवावर वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. जनादेशानुसार एक सभापतिपद काँग्रेसला मिळाल्याच हवे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli BJP May Give Committee Chair to Congress: Here's Why

Web Summary : Sangli BJP considers giving Congress a committee chair amid internal opposition. Congress demands a committee post, threatening election opposition. A final decision is awaited.