शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू उपशाने वारणाकाठ खचला

By admin | Updated: June 10, 2015 00:31 IST

नुकसानीने शेतकरी हादरला : पात्राची रुंदी वाढण्याचा धोका

सागाव : वारणा नदीमध्ये सुरु असणाऱ्या वाळू उपशामुळे नदीकाठ खचू लागला असून, शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतीच्या होत असलेल्या नुकसानीमुळे वारणाकाठचा शेतकरी हादरला आहे. नदीकाठ वाचविण्यासाठी वाळू उपसा बंद करावा, अशी मागणी शेतकरी व नागरिकांतून होत आहे.वारणा नदीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीतून नदी वाहते. दोन्ही जिल्ह्यांकडून वाळूचा ठेका दिला जात आहे. वाळू ठेकेदार नियमांना बगल देऊन वाळू उपसा करतात. जी जागा त्यांना ठरवून दिली जाते, त्याव्यतिरिक्त ज्या ठिकाणी सखल भाग मिळेल व वाळू चांगली मिळेल, तेथे प्रमाणापेक्षा जास्त यंत्रामार्फत वाळू उपसा करतात. अमर्याद वाळू उपशामुळे नदीकाठचा थर तुटत असून मोठ्या झाडांच्या व झुडपांच्या मुळ्यादेखील मोकळ्या होत आहेत. परिणामी झाडांसह सर्व भाग नदीपात्रात जात आहे.पुनवत-शिराळे खुर्द येथे वाळू उपशाचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. वाळू ठेकेदार सर्व यंत्रणा शेतकऱ्यांच्या शेतामधूनच हलवत आहेत. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाणंद रस्ते देखील अवजड वाहनांमुळे खचले आहे. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात सागाव येथे थेरगाव पाणवठा येथील नदीकाठ खचून सहा विद्युत मोठी पाण्यात गेल्या. याठिकाणची मोठी झाडेही नदीपात्रात गेली आहेत. वारणा नदीपात्रातील वाळू उपसा भविष्यात असाच सुरु राहिल्यास नदीकाठ खचण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. त्याचबरोबर पात्राची रुंदी देखील वाढणार आहे. या ठिकाणचा वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. (वार्ताहर)झाडांबरोबर मातीही...शासनाच्या धोरणानुसार नियम व अटी घालून वाळूचे ठेके दिले जात असले तरी, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होते. सध्या सुरू असलेल्या अमर्याद वाळू उपशामुळे नदीकाठचा थर तुटत असून मोठ्या झाडांच्या व झुडपांच्या मुळ्यादेखील मोकळ्या होत आहेत. परिणामी झाडांसह काठालगतची मातीही नदीपात्रात वाहून जात आहे. वारणा नदीपात्रातील वाळू उपसा भविष्यात असाच सुरु राहिल्यास नदीकाठ खचण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. परिणामी वारणा नदीकाठची जमीन नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे.