शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन योजनेत आटपाडी तालुक्यातील दहा गावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दहा गावांसाठी जलजीवन योजनेतून मंजुरी मिळाली आहे. यासाठी पाच कोटी ५७ लाख आठ हजार रुपयांचा ...

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील दहा गावांसाठी जलजीवन योजनेतून मंजुरी मिळाली आहे. यासाठी पाच कोटी ५७ लाख आठ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या प्रयत्नामुळे तालुक्याला निधी मिळाला आहे, अशी माहिती आटपाडी पंचायत समितीच्या सभापती पुष्पाताई सरगर यांनी दिली.

पुष्पाताई सरगर म्हणाल्या की, आटपाडी तालुक्यातील ४३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राष्ट्रीय पेयजल योजनेतून सोडवला आहे. उर्वरित दहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तो जलजीवन योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाला असून, तालुक्यातील मानेवाडी, कानकात्रेवाडी, पारेकरवाडी, घानंद, माडगुळे, वाक्षेवाडी, मुढेवाडी, बनपुरी, माळेवाडी, लेंगरेवाडी या दहा गावांच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाली आहे. आटपाडी तालुक्यातील ४३ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील तीन महिन्यांमध्ये सुटणार आहे. बाकीच्या गावांच्या पिण्याचा प्रश्नही सुटणार असून, कामे अंतिम टप्प्यात आहेत. गोपीचंद पडळकर, राजेंद्रअण्णा देशमुख यांनी योजनेला मंजुरी मिळवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज भोसले, जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य व पंचायत समितीच्या सर्व सदस्य व अधिकारी यांच्या प्रयत्नातून आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे.