शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते गर्दीने फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 23:58 IST

सर्वच गणेश मंडळांनी देखावे केले खुले

सांगली : शहरातील सर्वच गणेश मंडळांनी आपले देखावे शनिवारी खुले केले. देखावे पाहण्यासाठी आज अबालवृध्दांनी गर्दी केली होती. विशेषत: कॉलेज कॉर्नर ते गणपती पेठेपर्र्यंतचा रस्ता गर्दीने फुलून गेला होता. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची दक्षता यंदा गणेश मंडळांनी घेतली आहे. कॉलेज कॉर्नरवरील गणेश मंडळाने कॉलेजच्या शेजारच्या रस्त्यावर देखावा उभारला आहे. शहीद भगतसिंग मंडळानेही आपला मंडप यंदा छोटा केला आहे. या मंडळाने कालिका मंदिराची गुहा केली असून, पाठीमागील बाजूस अन्नछत्र मंडळ करण्यात आले आहे. जुन्या बुधगाव रस्त्यावरील वखारभाग मित्र मंडळाने पर्यावरणपूरक देखावा उभारला असून, यामध्ये हत्ती तीनचाकी सायकलीवरुन गणेशाला नेत असल्याचा देखावा आहे. याठिकाणी बालगोपाळांची गर्दी अधिक दिसून येत आहे. लक्ष्मीनारायण मंडळाने ‘नवजीवन ज्ञानेश्वरीला’ हा देखावा उभारला असून, याठिकाणीही गर्दी आहे. मोटार-मालक संघटनेच्या भव्य देखाव्याला शनिवारी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्या होत्या. पटेल चौकातील ‘चमत्कार खंडेरायाचा’ देखाव्यासाठी भली मोठी रांग लागत आहे. टेलिफोन भवनजवळ अष्टविनायक मंडळाने मंगेश मंदिराचा देखावा उभारला असून, यासाठी पुरुष व महिलांच्या रांगा लागत आहेत. गणपती पेठ, सराफ कट्टा, दत्त मारुती रस्ता, शास्त्री चौक रस्ता आदी रस्ते रात्री आठनंतर गर्दीने फुलून गेले होते. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आईस्क्रिम, भेळ, दाबेली, चायनीज व इतर खाद्यपदार्थांचे हातगाडे लागले आहेत. स्पिकरसाठी पाचव्या, सातव्या, नवव्या व अकराव्यादिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असून, देखावे मात्र रात्री बारापर्यंत खुले राहणार आहेत. चौका-चौकात पोलीस बंदोबस्तही तैनात केला आहे. (प्रतिनिधी)