शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

जयंतरावांच्या उजव्या, डाव्या नेत्यांत कुरघोड्या

By admin | Updated: April 23, 2015 00:41 IST

जिल्हा बँकेसाठी खटाटोप : योग्य-अयोग्यतेसाठी दाखले

अशोक पाटील- इस्लामपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदावर वर्णी लागण्यासाठी जयंत पाटील यांचे उजवे आणि डावे नेतेच आता एकमेकांवर कुरघोड्या करू लागले आहेत. आपण संचालकपदासाठी कसे योग्य आहोत आणि दुसरा कसा अयोग्य आहे, हेच जयंत पाटील यांच्यापुढे मांडले जात आहे.
वाळवा तालुक्यात जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. जिल्हा बँकेवरही पकड असावी, यासाठी पाटील यांचा प्रयत्न आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे बँकेवर तज्ज्ञ संचालकच निवडून जावेत, अशी अपेक्षा जयंत पाटील यांची आहे. परंतु प्रत्येक गावात त्यांचे स्वत:चे दोन-दोन, तीन-तीन गट आहेत. या गटाचे म्होरके आपण पाटील यांचे निकटवर्तीय आहोत, असा तोरा चावडीवर मिरवताना दिसत आहेत. काही नेते तर त्यांची हुबेहूब नक्कलही करताना दिसतात.
तालुक्यातील तीसभर नेत्यांनी संचालकपदाची मागणी केली आहे. यासाठी पाटील यांनी इच्छुकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कोल्हापूर, सांगली सीमाभागावर असलेल्या एका गावातील नेत्याने स्वत:चे कर्तृत्व पाटील यांच्यापुढे मांडले. या नेत्याने तालुक्यातील काही ज्येष्ठ नेत्यांवर टीका-टिप्पणी केली. आपण संचालक पदासाठी सुदृढ आहे, इतर इच्छुकांना हृदयरोग, मधुमेह आदी विकार जडले असून, राजकीय वारसा नसल्यामुळे मलाच संधी मिळावी, अशी मागणी करताच उपस्थितांतून हशा पिकला.
बँकेच्या संचालक पदासाठी ऐतवडे खुर्द येथील डॉ. प्रताप पाटील यांनी अर्ज भरला आहे, तर त्याच गावातील रघुनाथ पाटील यांनीही अर्ज दिला आहे. कणेगाव येथील जयंत पाटील यांचे उजवे हात समजणारे भीमराव पाटील-कणेगावकर यांनी अर्ज भरला आहे, तर विलासराव शिंदे गटाचे अ‍ॅड. विश्वासराव पाटील यांनीही अर्ज भरून भीमराव पाटील यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरेगाव येथील बी. के. पाटील यांचे अंतर्गत विरोधक असलेले व्यंकटराव पाटील यांनीही अर्ज भरून बी. के. पाटील यांना आव्हान उभे केले आहे.
ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या कागाळ्या सांगून आपणास संधी कशी मिळेल, यातच स्वारस्य मानत आहेत.