शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षावाला होणार पोलिसांचा खबरी!

By admin | Updated: July 7, 2014 00:41 IST

नवा उपक्रम : गुन्हे रोखण्यासाठी पाऊल

सचिन लाड ल्ल सांगली चोवीस तास रस्त्यावर असणारा आणि गल्लीबोळात कुठेही प्रवासी घेऊन जाणारा रिक्षाचालक आता पोलिसांचा खबरी होणार आहे. जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुन्हे रोखण्यासाठी ‘खबरी रिक्षाचालक’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी त्यांनी सांगली, मिरजेतील रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या उपक्रमात सहभागी होण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी पोलीस मुख्यालयात बैठकही आयोजित केली आहे.
पोलीस आणि रिक्षाचालक यांच्यात वाहतूक नियमांच्या उल्लंघनावरून नेहमी खटके उडतात. यामुळे पोलीस म्हटले की रिक्षाचालक जरा लांबच राहतात. समाजातील दुर्लक्ष घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असले तरी, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. २४ तास ते रस्त्यावर व्यवसायानिमित्ताने असतात. थंडी, ऊन किंवा पाऊस कोणताही हंगाम असो, रिक्षा फिरविल्याशिवाय त्यांच्या संसाराचा गाडा चालत नाही. मुख्य बसस्थानकासह शहरातील सर्व बस थांब्यांवर, रेल्वे स्थानके, चित्रपटगृह, मॉल, मल्टिप्लेक्स, शासकीय व खासगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, मंदिर, मोठ्या अपार्टमेंट परिसर अशा महत्त्वाच्या ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, घरफोडी, साखळीचोरी, अपघात असे महत्त्वाचे गुन्हे भरदिवसा घडतात. अनेकदा तेथेच रिक्षाचालकही प्रवाशांची प्रतीक्षा करीत थांबून असतात.
अनेक गुन्हे रिक्षाचालकांसमोर यापूर्वी घडले आणि आजही घडत आहेत. मात्र पोलिसांच्या चौकशीची कटकट नको म्हणून त्यांनी माहिती देण्याचे टाळले. पोलिसांची कामाची पद्धत पाहून रस्त्यावर एखादा अपघात झाला, तरी त्याची माहिती देण्यास लोक टाळतात. मात्र आता तसे काही होणार नाही, याचे नियोजन पोलीसप्रमुख सावंत यांनी केले आहे. रिक्षाचालक हा समाजात वावरणारा महत्त्वाचा घटक आहे. कधी, कुठे, काय घडले आहे, याची सर्व माहिती त्यांच्याकडे असते. त्यांच्याकडील माहिती मिळाली, तर गुन्हे रोखण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.