शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: डिजिटल अरेस्टची भीती घालून सावळजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाला ५९ लाखांचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:42 IST

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी दाखवली अटकेची भीती

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील एका ६१ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत अटकेची भीती दाखवून ५९ लाख नऊ हजार रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अण्णासाहेब बाळगोंडा पाटील (६१, रा. सावळज) यांनी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी अण्णासाहेब पाटील हे त्यांच्या घरी असताना, ८ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत त्यांना अज्ञात व्यक्तींचे व्हॉट्सॲप कॉल आले. संशयित आरोपी अजय पाटील आणि दया नायक यांनी स्वतःला पोलिस आणि सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले. त्यांनी फिर्यादींना व्हॉट्सॲपवर सीबीआयचा लोगो, सुप्रीम कोर्ट, इन्कम टॅक्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नावे बनावट पत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

याप्रकरणी अजय पाटील आणि दया नायक यांच्याविरुद्ध तासगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३३८, ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६ (क), ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, नागरिकांनी अशा बनावट कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

भीतीपोटी फिर्यादीने संशयिताच्या खात्यावर पाठवले पैसे

आरोपींनी फिर्यादींना व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून, त्यांना अटक करण्याची भीती दाखवली आणि गंभीर परिणामांची धमकी दिली. या भीतीपोटी फिर्यादीने आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यांवर वेळोवेळी एकूण ५९ लाख ९ हजार रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Retired Teacher Duped of ₹59 Lakh in Digital Arrest Scam

Web Summary : A retired teacher from Savlaj, Sangli, lost ₹59 lakh to fraudsters posing as CBI officers. They used fake documents and threats of arrest to extort money. Police have registered a case and are investigating.