वैभव शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिंदे गटाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:29 IST2021-08-26T04:29:21+5:302021-08-26T04:29:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आष्टा : आष्ट्याचे नेते वैभव शिंदे यांनी भाजपमधून बाहेर पडत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ...

Recognition of Vaibhav Shinde's NCP entry by Shinde group | वैभव शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिंदे गटाची मान्यता

वैभव शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला शिंदे गटाची मान्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्ट्याचे नेते वैभव शिंदे यांनी भाजपमधून बाहेर पडत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. त्यास पाठिंबा असल्याची ग्वाही बुधवारी आष्टा येथे बैठकीत शिंदेप्रेमी कार्यकर्त्यांनी दिली.

बैठकीस राजाराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष झुंजारराव शिंदे, झुंजारराव पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, प्राचार्य विशाल शिंदे, संगीता सूर्यवंशी, शैलेश सावंत, बाबासाहेब सिद्ध, धैर्यशील शिंदे, शेरनवाब देवळे, पंचायत समिती सदस्य जनार्दन पाटील, प्रकाश मिरजकर, प्रकाश रुकडे, डॉ. प्रफुल्ल आडमुठे, डॉ. प्रकाश आडमुठे, प्रीतम चौगुले, आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

झुंजारराव शिंदे म्हणाले की, माजी आमदार दिवंगत विलासराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कार्यकर्ते म्हणून काम केले आहे. शहराच्या विकासात त्यांचे योगदान मोठे होते. यामुळे वैभव शिंदे यांच्यासोबत संपूर्ण शिंदे गट असणार आहे.

नगराध्यक्षा स्नेहा माळी म्हणाल्या, आजवर शहरात काम करताना आम्ही केवळ शिंदे गट म्हणूनच काम केले आहे. आगामी काळातही शिंदे गट नेहमी वैभव शिंदे यांच्यासोबत राहणार आहे.

चौकट :

गट एकसंध राहणार

वैभव शिंदे यांचा बागणी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये झालेला पराभव जिव्हारी लागणारा होता. मात्र आता मागील सर्व घटना विसरून शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायचे आहे. येत्या काळात शिंदे गट एकसंध राहणार आहे, असे मत झुंजारराव पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Recognition of Vaibhav Shinde's NCP entry by Shinde group