शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

आभासी सुखासाठी शहरी भागाकडे ओढा

By admin | Updated: November 30, 2015 01:13 IST

रणधीर शिंदे : ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीवर सांगलीत चर्चासत्र

सांगली : वाढत्या अपेक्षांनी खेड्यातील जनतेचा शहराकडे वाढत चाललेला ओढा आणि त्यामुळे खेडी उद्ध्वस्त होत असताना, खेड्यात होणारा बदल अपरिहार्य आहे. गावाकडे आयुष्य काढलेल्यांनाही आता खेडी असुरक्षित वाटू लागल्याने गावांचा चेहरा हरवत चालला असून, आभासी सुखाच्या नादात खेड्यातील जनतेचा शहराकडे ओढा वाढत असल्याची खंत डॉ. रणधीर शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सांगली आणि मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोहन पाटील यांच्या ‘बांडगूळ आख्यान’ या कादंबरीवर आयोजित चर्चेत शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. तारा भवाळकर होत्या. डॉ. शिंदे पुढे म्हणाले, गाव, समाज तंत्र आणि सर्वच धोरणात बदल होत आहे. या बदलाचा आवाका समजून घेणे आवश्यक आहे. गावच्या जमिनी व निसर्ग संपत्तीवर बड्यांचा डोळा असल्याने खेडी बदलत आहेत. स्थानिक परंपरा नाहीशा होत असल्यानेही परिणाम दिसून येत आहे. आभासी सुखाच्या नादात गावाकडील लोक शहराकडे वळत असल्याचे सांगत मोहन पाटील यांनी ‘बांडगूळ आख्यान’ कादंबरीतून ग्रामीण भागातील चित्र प्रभावीपणे मांडल्याचेही त्यांनी सांगितले.ज्येष्ठ समीक्षक वैजनाथ महाजन म्हणाले, ४६ टक्के जनता आता ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतरित होत आहे अथवा विचारात आहे. मोठ्या अपेक्षेने शहाराच्या ओढीने चाललेल्या जनतेचे मन रमत नसल्याचे चित्र आहे. मोहन पाटील यांनी लिहिलेल्या या कादंबरीतून शहरी आणि ग्रामीण भाषेचा पट चांगल्या पध्दतीने मांडण्यात आलेला आहे. समकालीन मराठी साहित्यात महत्त्वाची कादंबरी म्हणूनही या कादंबरीचा उल्लेख व्हावा लागेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले. यावेळी प्रा. बापू जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य आर. जी. कुलकर्णी, डॉ. अनिल मडके यांच्यासह साहित्य परिषदेच्या सांगली शाखेचे सदस्य उपस्थित होते. (वार्ताहर)