जिल्ह्यात जत्रा, यात्रा भरविण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:18 IST2021-02-20T05:18:52+5:302021-02-20T05:18:52+5:30

सांगली : जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा, उरूसांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात ...

Prohibition of holding fairs and yatras in the district | जिल्ह्यात जत्रा, यात्रा भरविण्यास मनाई

जिल्ह्यात जत्रा, यात्रा भरविण्यास मनाई

सांगली : जिल्ह्यातील धार्मिक यात्रा, जत्रा, उरूसांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरी राज्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कार्यक्रमांच्या आयोजनाला मनाई असली तरी धार्मिक विधी करण्यास परवानगी असून, प्रातांधिकाऱ्यांनी याबाबत स्वत: पाहणी करून निर्णय घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. शासनाच्या आदेशाने जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व उपासना स्थळे सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे यात्रा, जत्रा, उरूस भरविण्यासाठी परवानगी द्यावी, यासाठीचे अर्ज येत आहेत. मात्र, सध्या रूग्णसंख्या वाढत असल्याने या कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी देण्यात येणार नाही. पोलीस प्रशासनाने याबाबतचे नियोजन करून निर्णयाची अंमलबजावणी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

Web Title: Prohibition of holding fairs and yatras in the district