शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

मानमोडीतील स्मशानभूमी रस्त्याचा प्रश्न ४३ वर्षांनी मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST

कुपवाड : मानमोडी (ता. मिरज) येथे गेल्या ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमी मार्गावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या ...

कुपवाड : मानमोडी (ता. मिरज) येथे गेल्या ४३ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमी मार्गावरील रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी जिल्हा परिषद सदस्या मनीषा पाटील यांच्या प्रयत्नातून दहा लाखांचा निधी देण्यात आला असून, नुकताच या कामाचा प्रारंभ करण्यात आला.

मानमोडीतील स्मशानभूमीच्या दिशेने जाणारा हा रस्ता गेल्या ४३ वर्षांपासून दुरवस्थेत होता. पावसाळ्यात ग्रामस्थांचे अतोनात हाल हाेत होते. अंत्यविधीस जाताना एक किलोमीटरची कसरत चिखलातून करावी लागत होती. चिखल आणि काटेरी झुडपांमुळे या मार्गावर वाहने घेऊन जाणे शक्य हाेत नव्हते. अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य, सरपण लोकांना खांद्यावरून घेऊन जावे लागत होते.

या रस्त्याच्या समस्येबाबत पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्या मनीषा पाटील यांच्याकडे केलेल्या मागणीला यश आले. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेतून दहा लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाचा आरंभ बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब कोरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पासाहेब हुळ्ळे, दत्तात्रय पाटील या मान्यवरांच्या हस्ते झाला.

कार्यक्रमास सरपंच सुरेश गायकवाड, उपसरपंच दयानंद म्होपरे, रमेश मुळीक, विजय सूर्यवंशी, हंबीरराव साळुंखे, संपत देसाई, आनंदा पवार, अनिल बसवण यांच्यासह सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : २४ कुपवाड १

ओळ : मानमोडी (ता. मिरज) येथील स्मशानभूमी रस्ता कामाचा आरंभ जिल्हा परिषदेचे माजी सभापती आप्पासाहेब हुळ्ळे याच्याहस्ते करण्यात आला. यावेळी आण्णासाहेब कोरे, सरपंच सुरेश गायकवाड, उपसरपंच दयानंद म्होपरे, रमेश मुळीक, विजय सूर्यवंशी, हंबीरराव साळुंखे उपस्थित होते.