शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

प्रवीणच्या अनोख्या प्रेमापुढे ओशाळला मृत्यू...

By admin | Updated: June 2, 2015 00:35 IST

सांगलीचा प्रियकर : प्रेयसीचा मृत्यू समोर दिसत असूनही केले लग्न, अहमदाबादमधील कहाणी

सांगली : प्रेम म्हणजे प्रेम असतं... तुमचं आमचं सेम असतं, असे सर्वच प्रेमिक म्हणत असले तरी, काहींचे प्रेम खरोखरच अनेकांना मार्गदर्शक असते. प्रेयसीचा मृत्यू काही महिन्यांवर येऊन ठेपला असतानाही, तिच्याशीच लग्न करण्याचा हट्ट धरुन कोणालाही न जुमानता तो पूर्ण करण्याचे कार्य सांगलीच्या एका प्रियकराने केले आहे. नियती ही कोणालाच टळलेली नाही. परंतु नि:स्वार्थी प्रेमाचा अनोखा आविष्कार बघून मृत्यूदेखील ओशाळला असेल. सांगलीतील प्रवीण पाटील हा उच्चशिक्षित तरुण. २००८ मध्ये तो काही कामानिमित्त गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे गेला होता. तेथेच त्याची वस्त्रापूर येथील रिक्रुटमेंट कंपनीत कार्यरत असणाऱ्या हितार्थी पारिख हिच्याशी नजरानजर झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. कालांतराने त्यांच्यातील भेटी वाढत गेल्या आणि ओळखीचे रूपांतर कधी प्रेमात झाले ते कळलेच नाही. प्रवीणने हितार्थीपुढे अचानक लग्नाचा प्रस्ताव ठेवला. वास्तविक हितार्थीला देखील प्रवीणशीच लग्न करायचे होते. परंतु एक महत्त्वाची अडचण होती आणि वस्तुस्थिती प्रवीणला सांगणे क्रमप्राप्तच होते. अखेर हितार्थीने आपल्याला कर्करोग असल्याचे प्रवीणला सांगितले. प्रेमात सर्व काही माफ असते, हे वाक्य ऐकायला ठीक असले तरी, लग्न करीन तर हितार्थीशीच, अशी भूमिका प्रवीणने घेतली. याला हितार्थीच्या कुटुंबियांनीच विरोध केला. परंतु प्रवीणने कोणाचेच ऐकण्यास नकार दिला. अखेर २०१० मध्ये दोघांचे लग्न झाले. दरम्यानच्या काळात हितार्थीवर वैद्यकीय अधिकारी उपचार करीतच होते. लग्नानंतर हितार्थीची जबाबदारी प्रवीणने आपल्या खांद्यावर घेतली. साहजिकच यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता, तो हितार्थीला अधिकाधिक काळ जग कसे पाहता येईल यासाठी तिच्यावर उत्तमातील उत्तम वैद्यकीय उपचारात सातत्य ठेवण्याचा. अर्थात त्याला खर्चही भरपूर येणार होता. पण प्रवीण डगमगला नाही. त्याने अधिक पैसे कमावण्यासाठी वारंवार नोकऱ्या बदलल्या. २०११, २०१२, २०१४ मध्ये हितार्थीवर मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कदाचित हितार्थी व प्रवीणचे नि:स्वार्थी प्रेम बघून मृत्यूदेखील त्यांच्या दाराबाहेर थांबला होता. प्रवीणने पाच वर्षाच्या कालावधित हितार्थीच्या उपचारासाठी १० लाख रुपये खर्च केले. तसेच आरोग्य विमा योजनेतून सुमारे १८ लाख रुपये खर्च झाले. एका शस्त्रक्रियेदरम्यान हितार्थीला रक्ताची नितांत गरज होती. त्यावेळी प्रवीणच्या कंपनीतील २१ सहकाऱ्यांनी रक्तदान केले होते. दिवसेंदिवस मृत्यू जवळ येत चालल्याची जाणीव सर्वांनाच होऊ लागली होती. परंतु अखेर मृत्यूने दारावर टिकटिक केलीच आणि १८ मे रोजी हितार्थीने रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. (प्रतिनिधी)