शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

मारेकऱ्यांपुढे पोलिसांनी टेकले गुडघे!

By admin | Updated: June 8, 2015 00:50 IST

पावसकर खून : आठ महिने पूर्ण; सूत्रधारही मोकाटच

सांगली : माधवनगर रस्त्यावरील शशिकांत पावसकर या तरुणाचा खून करणाऱ्या मारेकऱ्यांपुढे सांगली शहर पोलिसांनी गुडघे टेकले असल्याचे चित्र आहे. खून होऊन आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला, तरी याचा छडा लावता आलेला नाही. खुनाचा सूत्रधार कोण? हे माहीत असूनही केवळ त्याच्याविरुद्ध पुरावा नसल्याचे सांगून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे सूत्रधार मोकाटच आहे.शशिकांत पावसकर या १९ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह कृष्णा नदीत सापडला होता. त्याचे हात-पाय बांधलेले होते. नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला होता. घरातून त्याला बोलावून नेऊन, त्याचा दुसऱ्या ठिकाणी खून करुन त्याला नदीत फेकून देण्यात आले होते. आतापर्यंत अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पण कोणतेही धागेदोरे हाती लागलेले नाहीत. गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या अन्य भानगडी जोरात सुरु असतात. परंतु त्यांना हा गुन्हा उघडकीस आणण्यास मेहनत घेण्यास वेळ नाही. कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार तीन महिन्यापूर्वी सांगली शहर पोलिसांच्या दफ्तर तपासणीस आले होते. त्यावेळी त्यांनीही या खुनाचा गुन्हा का उघडकीस आला नाही? असा जाब विचारला होता. त्यानंतर त्यांनी हे प्रकरण पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे सोपविले होते. गायकवाड यांनीही गतीने तपास केला. पण त्यांनाही अपयश आल्याचे चित्र आहे.पावसकरचा खून अनैतिक संबंधातून झाला आहे; तसेच मारेकरी कोण आहेत, हे आम्हाला माहिती आहे, असे पोलीस सांगत आहेत. मग मुळापर्यंत जाऊन का तपास केला जात नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अत्यंत गुंतागुतीचे खुनाचे गुन्हे सांगली पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. मग हा गुन्हा का उघडकीस आणला जात नाही? तांत्रिक व जुन्या अशा दोन पद्धतीने आतापर्यंत तपास झालेला आहे. शहरातील काही गुन्हेगार व पावसकरच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र हाती काहीच लागले नाही. मारेकऱ्यांनी हा खून पचविला की काय? असे आता वाटू लागले आहे. पोलिसांनीही मारेकऱ्यांपुढे गुडघे टेकले असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)