शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक, कर्मचाऱ्यात वादावादी

By admin | Updated: September 14, 2014 23:55 IST

पोलीसप्रमुखांकडून दखल : विश्रामबाग ठाण्यातील प्रकार

सांगली : विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय भांगे व हेड कॉन्स्टेबल अकीब काझी यांच्यात पोलीस ठाण्यातच गैरहजेरी मांडल्याच्या कारणावरून जोरदार वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रकार घडला. शिवीगाळही करण्यात आली. या प्रकारानंतर भांगे हे रजेवर गेल्याने जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी या प्रकाराची गंभीर दाखल घेतली. चौकशी करून काझी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी आज (रविवार) सायंकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.आठवड्यापूर्वी जतचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब रेड्डी यांचे निधन झाले होते. त्यावेळी काझी ड्युटीवर असताना कोणास काही न सांगता रेड्डींच्या अंत्यदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी ते पोलीस ठाण्यात परतले, त्यावेळी त्यांना त्यांची गैरहजेरी मांडल्याचे समजले. याचा जाब त्यांनी निरीक्षक भांगे यांना विचारला. भांगे यांनी त्यांना ‘तू कोण मला विचारणार’असे सुनावले. यातून दोघांत जोरदार वाद झाला. शिवीगाळही करण्यात आली. त्यांच्यात सुरू असलेल्या जोराच्या वादावादीने मुख्यालयाच्या परिसरातील पोलिसांनी ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचाही प्रकार घडला. या प्रकारानंतर भांगे यांनी स्टेशन डायरीला नोंदही केल्याचे समजते, मात्र यासंदर्भात अधिकृत माहिती मिळाली नाही. यासंदर्भात पोलीसप्रमुख सावंत म्हणाले, घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. कर्मचारी जर ठाण्याच्या प्रमुखांना शिवीगाळ करून अंगावर धाऊन जात असेल, तर त्या पदाला काहीच अर्थ नाही. काझी यांचे एवढे धाडस कसे झाले. त्यांची चौकशी केली आहे. चौकशीत ते दोषी आढळले, तर त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)धनंजय भांगे रजेवरसावंत म्हणाले, भांगे सध्या रजेवर आहेत. या प्रकारामुळे ते रजेवर गेले आहेत की काय? याची माहिती घेतली जाईल. ते येत्या एक-दोन दिवसात हजर होतील. त्यांच्याकडूनही माहिती घेतली जाईल. विश्रामबाग ठाण्यातून बदली होऊनही काहीजण तळ ठोकून असतील, तर त्यांना सोडले जाईल.