शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट रस्त्यांचा उद्योजकांकडून पंचनामा

By admin | Updated: November 28, 2015 00:17 IST

अधिकारी धारेवर : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील काम बंद पाडले; उद्योग मंत्र्यांना साकडे घालणार

कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम सध्या ठेकेदाराकडून अतिशय घाईगडबडीत व निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने उद्योजकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे़ त्या पार्श्वभूमीवर येथील उद्योजकांनी कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन निकृष्ट कामाचा पंचनामा केला़ यावेळी निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारालाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्यामुळे उद्योजकांनी अधिकाऱ्याला धारेवर धरले़ तसेच पाच तास उद्योजकांनी काम बंद पाडले़कुपवाड एमआयडीसीमध्ये औद्योगिक विकास महामंडळाकडून सुमारे दहा कोटीचे रस्ते केले जात आहेत़ उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे उद्योजकांनी याबाबत पाठपुरावा केल्यामुळेच हे रस्त्याचे काम मंजूर झाले़ मिरज एमआयडीसीमध्येही रस्त्याची कामे सुरू आहेत़ त्याठिकाणी मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अत्यंत काळजीने ही कामे करून घेत आहे़ त्यामुळे मिरज एमआयडीसीमधील कामाबाबत तेथील उद्योजकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे़ कुपवाड एमआयडीसीमध्ये मात्र संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे़ कुपवाड एमआयडीसीमध्ये पावसाळ्यापूर्वी सुरू झालेले हे रस्ताकाम अद्यापपर्यंत सुरूच आहे़ कामास उशीर झाल्याने सध्या हे काम संबंधित ठेकेदाराकडून घाईगडबडीत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे़ काही ठिकाणी रस्ता उखडू लागला आहे़, तर काही ठिकाणी माती न काढताच त्यावर डांबरीकरण केले जात आहे़ पाण्याचा निचरा करण्यासाठी पाईपही टाकल्या गेल्या नाहीत़ त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसीमधील उद्योजकांमध्ये मोठ्याप्रमाणात नाराजी पसरली़ त्याचा उद्रेक शुक्रवारी झाल्याने उद्योजक डी़ के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, चंद्रकांत पाटील, शशिकांत मसुटगे, प्रफुल्ल शिंदे, नेमाणी यांच्यासह इतर उद्योजकांनी कार्यकारी अभियंता प्रमोद शेटके व उपअभियंता एस़ एस़ मलाबादे यांची भेट घेतली़ यावेळी कुपवाड एमआयडीसीमध्ये निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याबद्दल उद्योजकांनी त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर, ठेकेदारास पाठीशी घालण्याचा उद्योग एका अधिकाऱ्याकडून झाल्याने उद्योजकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले़ यावेळी जोरदार वादावादी झाली़त्यानंतर कार्यकारी अभियंता शेटके यांच्यासह अधिकाऱ्यांना कुपवाड एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष कामावर नेऊन निकृष्ट दर्जाचे काम दाखविल्यानंतर त्यांनी ठेकेदाराकडून झालेली चूक मान्य केली़ कार्यकारी अभियंता शेटके यांनी ठेकेदारांना सक्त ताकीद देऊन काम सुधारण्यास सांगितले़़ तसेच काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी क्रॉस पाईप टाकण्याविषयी सूचना दिल्या़ हे सुरू असलेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम एमआयडीसीतील उद्योजकांनी सुमारे पाच तास बंद पाडले होते़ उद्योजकांनी यावेळी ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरल्यानंतरही संबंधित ठेकेदाराने पुन्हा त्याच पध्दतीने काम सुरू केल्यानंतर उद्योजक डी़ के. चौगुले, मनोज भोसले, जफर खान, बामणोलीचे उपसरपंच अंकुश चव्हाण, चंद्रकांत पाटील यांच्यासह उद्योजकांनी उद्योगमंत्री देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचे निश्चित केले आहे़ कामाचा दर्जा पाहून कामाचे थर्ड पार्टी आॅडिट करावे़, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा उद्योजकांनी निवेदनात दिला आहे़ औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या सुरू असलेले डांबरीकरणाचे काम उद्योजकांनी चांगल्याप्रकारे करून घ्यावे़ निकृष्ट असल्यास याबाबत आमच्याकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहनही चौगुले, भोसले व खान यांनी केले आहे़ (वार्ताहर)उद्योजकांची रकमेबाबत फसवणूक़़़़़औद्योगिक विकास महामंडळाकडून कुपवाड एमआयडीसीमध्ये सुमारे दहा कोटी रूपयांचे रस्ते डांबरीकरणाचे काम केले जात आहे़ मात्र, एमआयडीसीचे अधिकारी आणि ठेकेदारांनी संबंधित रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुमारे पाच कोटी रूपयांचे होत असल्याचे उद्योजकांना सर्वांसमोरच सांगून टाकले़ तसेच बिलो टेंडर घेतले असल्याने सांभाळून घ्या, असेही उद्योजकांना ठेकेदाराने सांगितले़ त्यावेळी उद्योजकांनी, परवडत नसेल तर काम का घेतले? असा सवाल ठेकेदारासमोर उपस्थित केला़ कमी आकडे सांगून उद्योजकांची एकप्रकारे फसवणूक केली जात असल्याचे उद्योजक भोसले यांनी पत्रकारांना सांगितले़ निकृष्ट कामाची अधिकाऱ्यांनी दिली कबुलीरस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले असून हा रस्ता खराब होणार आहे. यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई व मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स व कुपवाड एमआयडीसीचे माजी उपाध्यक्ष डी. के. चौगुले यांनी दिली.