शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पतंगराव, जयंतरावांचा तासगावकडे कानाडोळा

By admin | Updated: November 15, 2016 23:39 IST

भाजपच्या मतांवर डोळा : नगरपालिका निवडणुकीला सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीची किनार

दत्ता पाटील ल्ल तासगाव तासगाव नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने तासगावात रणधुमाळी सुरू आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने प्रचाराला सुरुवात केली आहे, तर काँग्रेसची बुधवारपासून सुरुवात होत आहे. मात्र या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादीचे पालकत्व असणारे आमदार जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते आमदार पतंगराव कदम यांनी मात्र या रणधुमाळीत तासगावकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. तासगावात भाजपची आणि खासदार संजयकाका गटाची १४ मते आहेत. मतदान दोन दिवसांवर आले तरी, दोन्ही भाजपकडून भूमिका स्पष्ट झालेली नाही. भाजपच्या या मतांवर डोळा ठेवून या दोन्ही नेत्यांनी तूर्तास तासगावकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे. तासगाव नगरपालिका निवडणुकीत तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून खासदार संजयकाका पाटील यांनी पायाला भिंगरी बांधून तासगाव शहर पिंजण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडून आमदार सुमनताई पाटील आणि स्मिता पाटील यांनी तासगावात ठाण मांडले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनीही शहरातील प्रत्येक मतांवर लक्ष केंद्रित केले आहे. तिरंगी लढतीत शेकाप आणि शिवसेनेसह अन्य अपक्षांनीही चांगलेच आव्हान निर्माण केले आहे. अटीतटीने होत असलेल्या या निवडणुकीच्या प्रचाराची यंत्रणा जोमात आहे. भाजपची सर्वस्वी मदार खासदार पाटील यांच्यावर आहे. त्यांनी शनिवारी प्रचाराला सुरुवात केली. राष्ट्रवादीची मदार आमदार सुमनतार्इंवर असली तरी, आबांच्या पश्चात आमदार जयंत पाटील यांच्याकडे तालुक्याचे पालकत्व आहे. त्यामुळे प्रचाराच्या प्रारंभाला ते येतील, अशी चर्चा होती. मात्र जयंत पाटील यांनी तासगावकडे कानाडोळा केला. काँग्रेसच्या जाहीर प्रचाराचा प्रारंभ बुधवारी होत आहे. तासगावची धुरा महादेव पाटील यांच्याकडे असली तरी, आमदार पतंगराव कदम यांच्याकडून पाटील यांना रसद पुरवण्यात येत होती. मात्र काँग्रेसकडून होणाऱ्या प्रचाराच्या प्रारंभाला पतंगराव कदम उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याआधी आमदार कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्याकडून खासदार आणि भाजपवर सातत्याने निशाणा साधला जात होता, तर आमदार जयंत पाटील यांच्याकडून तासगावात राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यासाठी लक्ष केंद्रित केले होते. मात्र विधानपरिषद निवडणुकीत दोन्ही काँग्रेस आमने-सामने आले आहेत. मतदानाची तारीख दोन दिवसांवर आली तरीदेखील खासदारांनी भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. भाजपच्या या मतांवर डोळा ठेवूनच आमदार जयंत पाटील आणि आमदार पतंगराव कदम यांनी तासगावच्या निवडणुकीकडे कानाडोळा केल्याची चर्चा असून, या मतदानानंतरच हे दोन्ही नेते तासगावकडे लक्ष केंद्रित करतील, अशी चर्चा आहे. खासदार समर्थकांचे मतदान निर्णायक ? विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी मतदार असणाऱ्या नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचे प्रत्येक मत विजयी होण्यासाठी लाखमोलाचे ठरणार आहे. तासगावात खासदार संजयकाका पाटील समर्थक १४ मते आहेत, तर जिल्हा परिषदेचे एक मतही खासदारांच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. खासदारांची १५ मते विधानपरिषदेसाठी निर्णायक ठरणारी आहेत. ही मते कोणाच्या पारड्यात टाकायची, याबाबत अद्याप खासदारांकडून कोणतीही भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळेच दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची गोची झाली आहे.