‘सेवा हमी’ व्यतिरिक्त दाखले न देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST2021-03-06T04:26:32+5:302021-03-06T04:26:32+5:30

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संवर्ग काम करीत असतात. परंतू दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडून खरेदी, विक्री, हस्तांतरण, वाटपपत्र आदी कामांसाठी गावठाणात ...

Order not to issue certificates other than ‘Service Guarantee’ | ‘सेवा हमी’ व्यतिरिक्त दाखले न देण्याचे आदेश

‘सेवा हमी’ व्यतिरिक्त दाखले न देण्याचे आदेश

ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी संवर्ग काम करीत असतात. परंतू दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडून खरेदी, विक्री, हस्तांतरण, वाटपपत्र आदी कामांसाठी गावठाणात असलेचा दाखला, सिटी सर्व्हे झाला नसल्याचा दाखला, महारवतन, देवस्थान, ईनामी जमिनी, शासकीय प्रयोजनातून इमारत झाली नसल्याच्या दाखल्यांची मागणी केली जाते.

तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून एकमेव विधवा वारस पत्नी असल्याच्या दाखल्याची मागणी केली जाते. मात्र, याचा समावेश सेवा हमी कायद्यात नाही.

तरीही अशा दाखल्यांची मागणी करून ग्रामस्थ ग्रामसेवकास वेठीस धरतात. त्यामुळे अशा पद्धतीचे दाखले देण्यात येणार नसल्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने केली होती. त्यानुसार सेवा हमी कायदा समावेश असलेल्या कोणत्याही प्रकारची दाखल्याची मागणी करू नये, असे पत्र गट विकास अधिकारी बापट यांनी दिले आहे.

Web Title: Order not to issue certificates other than ‘Service Guarantee’