शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

‘एलसीबी’ला पर्यायी यंत्रणा

By admin | Updated: June 3, 2015 01:02 IST

मनोजकुमार शर्मा : गुन्हे नियंत्रणासाठी उचलले पाऊल

कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व गुन्हे आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबर (एल.सी.बी.) आता पर्यायी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.डॉ. शर्मा म्हणाले, पोलीस दलातील गुन्हे प्रकटीकरणासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा हे पोलीस दलाचे मूलभूत अंग आहे. जिल्ह्यात कोठेही अवैध धंद्यांवर धाडी टाकण्याचे त्यांना सर्वाधिकार असतात. त्यामुळे या शाखेसाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांची धडपड असते. ही शाखा कोणतीही कारवाई सुरुवातीला मोठ्या जोमाने करते; पण कालांतराने तिला मरगळ येते. ‘एलसीबी’मध्ये यापूर्वी एक-एक पोलीस कर्मचारी सात ते आठ वर्षे ठाण मांडून असायचा. या कर्मचाऱ्याने एखादा गुन्हा उघडकीस आणायचे ठरविले तर शाखेमधील सर्व कर्मचारी कामाला लागत असत. त्या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाऊन तो उघडकीस आणत होते; पण आता मरगळ झटकण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेबरोबर पोलीस दलाने पर्यायी यंत्रणा उभी करण्यास सुरुवात केली आहे. या यंत्रणेत पोलीस दलातील अनुभवी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असणार आहे. मटका, जुगार, तसेच गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी यांचा उपयोग होणार आहे. ‘एलसीबी’ म्हणजे...पोलीस दलातील एलसीबी विभाग म्हणजे पूर्वी ‘सोन्याची अंडे देणारी कोंबडी’ असे समजले जात होते. आता पोलिसांसमोर गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे काम चांगले आहे, त्यांनाच ‘एलसीबी’त जागा, असे सूत्र आहे.निरीक्षकांसमोर आव्हानस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. त्यामुळे मोहिते यांच्यासमोर गुन्हे प्रकटीकरणाचे आव्हान असणार आहे.