शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गुंड म्हमद्या नदाफकडून एकावर गोळीबार, मध्यरात्रीच्या सुमारास घडली घटना

By घनशाम नवाथे | Updated: November 15, 2024 13:38 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून तत्काळ अटक

सांगली : सांगलीतील कुख्यात गुंड महंमद ऊर्फ म्हमद्या जमाल नदाफ आणि चार साथीदारांनी सांगलीत गणेशनगर येथे सलीम मकबुल मुजावर (वय ४२, रा. गणेशनगर) याच्यावर गोळीबार केला. गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. गोळीबाराच्या घटनेनंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात म्हमद्याला अटक केली. गोळीबारप्रकरणी म्हमद्यासह संशयित इम्रान दानवडे, पप्पू फाकडे, फारूख मुबारक नदाफ (रा. सांगली) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गुंड म्हमद्या नदाफ आणि टोळीला सांगलीतील संजयनगर येथील मनोज माने याच्या खुनानंतर ‘मोका’ लावला होता. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याला महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात वास्तव्य न करण्याच्या अटीवर जामिन मंजूर केला होता. त्यानंतर गतवर्षी त्याला गोवा येथे सोडले होते. तरीही सांगली जिल्ह्यात त्याच्या टोळीच्या कारवाया सुरू होत्या. नुकतेच काही दिवसापूर्वी म्हमद्याच्या साथीदारांची आणि मिरजेतील काझी टोळीतील सदस्यांची हाणामारी झाली होती. आर्थिक वादातून हा प्रकार घडला होता. त्यामुळे म्हमद्या पुन्हा चर्चेत आला होता.सांगलीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार पप्पू फाकडे आणि इम्रान दानवडे हे म्हमद्याच्या संपर्कात होते. फाकडे आणि दानवडे यांच्यातील आर्थिक देवघेवीमधून सलीम मुजावर याच्याशी वाद झाला होता. त्यामुळे फाकडे आणि दानवडे या दोघांनी कट रचून म्हमद्यामार्फत मुजावर याला बोलवून काटा काढण्याचे ठरवले होते. त्यानुसार गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात मुजावर याला बोलवून घेतले. तेव्हा म्हमद्याने त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. मुजावर याच्या बरगडीत गोळी घुसल्यामुळे तो जखमी झाला. त्यानंतर संशयित तेथून पसार झाले.गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक संजय मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे पथक म्हमद्याच्या मागावर होते. त्याला शुक्रवारी पहाटे कोल्हापूर जिल्ह्यात ताब्यात घेतले.

२३ गुन्हे दाखलगुंड म्हमद्यावर खून, खुनाचा प्रयत्न, आर्म ॲक्ट, मारामारी असे तब्बल २३ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात बंदी असताना देखील तो त्याची टोळी चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस त्याच्यावर काय कारवाई करणार? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस