माधवनगरला पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST2021-04-12T04:23:37+5:302021-04-12T04:23:37+5:30

सांगली : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून माधवनगरमध्ये एकास हत्याराने मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश गणपतराव साळुंखे ...

One killed in Madhavnagar out of prejudice | माधवनगरला पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

माधवनगरला पूर्ववैमनस्यातून एकास मारहाण

सांगली : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून माधवनगरमध्ये एकास हत्याराने मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी महेश गणपतराव साळुंखे (वय ४२, रा. बुधवार पेठ, माधवनगर) यांनी वैभव सुरेश पाटील, अभी ऊर्फ पेद्या (पूर्ण नाव नाही, दोघेही रा. बसस्टॉपजवळ माधवनगर) यांच्याविरोधात संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास माधवनगर येथील बसस्थानकाजवळ फिर्यादी महेश व त्यांचे मित्र मनोज शिंदे थांबले होते. याचवेळी संशयित तिथून मंडईकडे चालले होते. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून ते परत आले व त्यांनी शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली, तर एका संशयिताने हातातील हत्याराने कमरेवर व डाव्या हातावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: One killed in Madhavnagar out of prejudice