सांगलीत अपघातात एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:27 IST2021-09-25T04:27:27+5:302021-09-25T04:27:27+5:30

सांगली : शहरातील जुना धामणी नाका ते स्फूर्ती चौक रोडवर मोटारीने धडकेत एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रमेश ...

One injured in Sangli accident | सांगलीत अपघातात एक जण जखमी

सांगलीत अपघातात एक जण जखमी

सांगली : शहरातील जुना धामणी नाका ते स्फूर्ती चौक रोडवर मोटारीने धडकेत एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी रमेश हुचाप्पा देगडी (रा. कुंभार मळा, विश्रामबाग, सांगली) यांनी साजीद लियाकत बागवान (रा. शिवाजी रोड, मिरज) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवार, दि.१५ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी देगडी कुत्र्याला घेऊन रस्त्याबाजूने जात होते. नेमके याचवेळी बागवान हा पाठीमागून आला व त्याने देगडी यांना जोराची धडक दिली. या अपघातात कुत्र्याचा मृत्यू झाला, तर देगडी यांच्या हातास गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतरही बागवान हा तिथे न थांबता निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार बागवान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One injured in Sangli accident