शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार साहित्य निर्मितीची गरज

By admin | Updated: December 26, 2014 00:09 IST

साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये.

आळसंद : ग्रामीण भागातील साहित्यिकांनी शहरातील साहित्यिकांचे साहित्य जरूर वाचावे. परंतु त्याचे अनुकरण मात्र करू नये. दर्जेदार साहित्याची निर्मिती करायची असेल, तर साहित्यिकांनी स्वत:ला प्रकट करायला शिकले पाहिजे, असे मत ज्येष्ठ व पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले.बलवडी (भा., ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळ व मारूती नाना पवार सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २३ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात डॉ. साळुंखे बोलत होते. ते म्हणाले की, प्रत्येक माणसाने आपले वेगळेपण प्रकट केले पाहिजे. जिज्ञासा ही माणसाच्या चांगुलपणाचे वैशिष्ट्य आहे. नवोदित साहित्यिकांनी ज्ञानाच्या कक्षा रूंदावण्यासाठी माणसांनी साहित्य वाचले पाहिजे. या परिसराने जगण्याची प्रेरणा दिली. नवा शब्द शिकणे म्हणजे नवा मित्र जोडणे होय. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तरूणांना दिले, तर नव्या बदलाचा वेध घेण्याचा प्रयत्न ते करतील.संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ या विषयावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा ज्यादा कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका असून, साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. वेदना हा कलेचा आत्मा असून कलावंताकडे एक्स-रेसारखी नजर असली पाहिजे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण भागातील साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.अ‍ॅड. के. डी. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली. कविसंमेलनाचे अध्यक्षपद सौ. नंदिनी साळुंखे-पाटील यांनी भूषविले. सतीश लोखंडे यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक पवार यांनी आभार मानले. यावेळी भाई संपतराव पवार, सरपंच मनीषा दुपटे, अ‍ॅड. सुभाष पाटील, इंद्रजित देशमुख, अरविंद पत्की, प्रा. शामराव पाटील, उपसरपंच बापूसाहेब पवार, वसंत आपटे, अंधकवी चंद्रकांत देशमुखे, प्रा. विश्वनाथ गायकवाड, रघुराज मेटकरी, रघुनाथ पवार, आनंदराव पाटील, हेमंत पाटील उपस्थित होते. (वार्ताहर) शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडावी‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि ग्रामीण साहित्य’ यावरील परिसंवादात प्रा. बाबूराव गुरव म्हणाले की, शेती पाण्याच्या प्रश्नावर दहापेक्षा जास्त कादंबऱ्या वाचावयास मिळत नाहीत, ही शोकांतिका आहे. साहित्यिकांनी पाणीप्रश्नाबाबत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. त्यांच्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडण्याची गरज आहे. शेतकऱ्याच्या हृदयात हात घालून साहित्य लिहिण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनातून मोठे साहित्यिक निर्माण व्हावेत.