शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

कडेगाव तालुक्यात वाढीव गावठाणांमध्ये सिटी सर्व्हेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:25 IST

कडेगाव : कडेगाव शहरासह तालुक्यातील सिटी सर्व्हे झालेल्या २० गावांमध्ये गावठाणातील जागा संपल्याने लोकांनी शेजारील शेतजमिनीत घरे बांधली. ...

कडेगाव :

कडेगाव शहरासह तालुक्यातील सिटी सर्व्हे झालेल्या २० गावांमध्ये गावठाणातील जागा संपल्याने लोकांनी शेजारील शेतजमिनीत घरे बांधली. सिटी सर्व्हे होऊन ४० वर्षे झाली. तेव्हापासून गावठाण हद्दीबाहेर बांधलेल्या घरांची नोंद अकृषक (एनए) न करता केवळ करवसुलीसाठी ग्रामपंचायत दप्तरी नोंद झाली आहे. ही घरे कायदेशीर गावठाणात यावीत यासाठी सिटी सर्व्हे व्हावा, अशी मागणी आहे.

वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावठाण विस्तार होणे अपेक्षित आहे. दर दहा वर्षांनी जनगणना झाल्यावर वाढीव गावठाण प्रस्ताव घेऊन मंजूर करणे गरजेचे होते. १९८२ मध्ये तालुक्यातील २० गावांचा सिटी सर्व्हे झाला आहे. तेव्हापासून ग्रामपंचायती आणि शासनानेही वाढीव गावठाण मंजुरीकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या गावठाणातील जागा संपलेल्या आहेत. गावाशेजारील शासकीय जमिनीही संपुष्टात आल्या आहेत. गावाशेजारील शेतजमिनी विकत घेऊन गावकुसाबाहेर घरे बांधली जात आहेत. या घरांना सोयी-सुविधा देताना काही ठिकाणी अडचणी येतात; पण ग्रामपंचायतींनी गावठाणाव्यतिरिक्त होणाऱ्या नवीन घरे व बंगल्यांचा सर्व्हे करून त्यांची ग्रामपंचायत दप्तरी नोंद केली. या नोंदीतून ग्रामपंचायतींना मिळणारा कररूपातील महसूल वाढला; पण या घरांना वीज, पाणी, गटारी व इतर मूलभूत सुविधा देताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

काही ठिकाणी घर मालकांना एकत्र येऊन पाण्याची पाइपलाइन, विजेचा खांब, गटारी बांधाव्या लागत आहेत. यातून मुक्तता होऊन ग्रामपंचायतींची सुविधा सर्व घरांना मिळण्यासाठी महसूल विभागाने गावठाण विस्तार योजना सुरू केली होती; पण याकडे दुर्लक्ष झाले. तालुक्यातील ३६ गावांत अद्याप सिटी सर्व्हेही झालेला नाही, तेथे सिटी सर्व्हे व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

चौकट :

या २० गावांत वाढीव गावठाण सर्व्हेची गरज

कडेगाव शहर, कडेपूर, चिंचणी, वांगी, देवराष्ट्रे, अंबक, मोहित्यांचे वडगाव, रामापूर, हिंगणगाव बुद्रुक, खेराडे (वांगी), येतगाव, तोंडोली, शाळगाव, विहापूर, आमरापूर, नेवरी, हिंगणगाव (खुर्द), तडसर, शिवणी, वडिये रायबाग या गावांचा सिटी सर्व्हे झाला आहे. मात्र, येथे गावठाणबाहेर मोठा विस्तार झाला आहे.