शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रॅक्टरला धडकून नेवरीचे दोघे ठार

By admin | Updated: March 6, 2015 01:05 IST

एकजण गंभीर जखमी

कडेगाव : दुचाकी आणि उसाचा ट्रॅक्टर यांच्या अपघातात नेवरी (ता. कडेगाव) येथील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. अमोल अंकुश महाडिक (वय ३४) व सोमनाथ शिवाजी सुतार (२६) अशी मृतांची नावे आहेत. रवींद्र शंकर भिसे गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी रात्री नऊ वाजता कोतीज (ता. कडेगाव) येथे घडली. याबाबत कडेगाव पोलिसांत रवींद्र भिसे याने फिर्याद दिली आहे.
नेवरी येथील अमोल, सोमनाथ आणि रवींद्र हे तिघे मित्र दुचाकी (एमएच १० बीएल ५३४०)वरून रायगाव येथे कामानिमित्त गेले होते. तेथून नेवरीला परत येत असताना कोतीजजवळ उसाचे तीन ट्रॅक्टर येत होते.
यातील दोन ट्रॅक्टर पुढे गेल्यावर तिसऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अमोलच्या दुचाकीची धडक बसली. ही धडक एवढी जोराची होती की, अमोल आणि सोमनाथ यांच्या चेहऱ्यावर, गळ्यावर उसामुळे जबर मार बसला. ते दुचाकीसह १० ते १५ फूट फरफटत गेले. अमोल जागीच ठार झाला, तर सोमनाथचा कऱ्हाडला उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. रवींद्र भिसे याच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती सुधारत आहे.
अमोल विवाहित असून, त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. सोमनाथच्या पश्चात आई, वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. अपघाताचे वृत्त गावात समजताच युवकांनी कोतीजच्या दिशेने धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. घटनेनंतर चालकाने ट्रॅक्टरसह पलायन केले. सहायक पोलीस निरीक्षक पी. एन. मोकाशी यांनी घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)