शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
2
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
3
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
4
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
5
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
6
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
7
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
8
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
9
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
10
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
11
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
12
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
13
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
14
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
15
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
16
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
17
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
18
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
19
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
20
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
Daily Top 2Weekly Top 5

‘मॉर्निंग वॉक’वाल्यांच्या सलाईनमधून निसर्गप्रेमाचे ठिबक

By admin | Updated: April 23, 2015 00:38 IST

सांगलीतील उपक्रम : शंभरावर झाडे जगविली, ओसाड जागेवर फुलणार हिरवाई...गुड न्यूज

अंजर अथणीकर - सांगली  निसर्गाच्या संगतीने ज्यांचा दिवस उजाडतो, अशा लोकांनी निसर्गाप्रती उतराई म्हणून एक वेगळा उपक्रम सांगलीत सुरू केला. चर्चा, गाजावाजा न करता केवळ कर्तव्यभावनेतून त्यांनी जागा मिळेल तिथे वृक्षलागवडीचे काम हाती घेतले. निसर्गाच्या कुशीतच वसलेल्या विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात अनेकठिकाणी ओसाड भाग त्यांना दिसत होता. महाविद्यालय प्रशासनाची परवानगी घेऊन त्यांनी शंभरावर वृक्षलागवड केली. सलाईनच्या वापरातून त्यांनी ठिबक पद्धतीने ही झाडे जगविली आहेत.
विलिंग्डन महाविद्यालयाच्या परिसरात श्रीधर धामणीकर, नंदकुमार धामणीकर, गजानन मडीवाळ, डॉ. सचिन उदगावे, डॉ. सौ. उदगावे, मंदा करंदवाडीकर, डॉ. संतोष कल्लोळी, दत्तात्रय हेरडे, दीपक कुंभार, दीपक बाशेल आदी २० ते २५ ज्येष्ठ नागरिक या परिसरात सकाळी फिरण्यास जातात. या परिसरात वृक्ष नसल्यामुळे परिसर तसा ओसाड दिसत होता. त्यामुळे या परिसरात वृक्ष लागवड करावी, अशी कल्पना त्यांना सुचली. रोज फिरत असताना याबाबत चर्चा होत असे. शेवटी एक दिवस सर्वांनी थांबून याबाबत निर्णय घेतला. अनेकांनी आपआपली जबाबदारी उचलण्याचे निश्चित केले.
विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर ताम्हणकर यांची सर्वांनी भेट दिली. आपल्या परिसरात वृक्ष लागवड झाल्यास आपण स्वागतच करू, असे त्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाने चार ते सहा वृक्षांची जबाबदारी घेऊन संपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेरील बाजूने शंभरहून अधिक वृक्षलागवड केली. यामध्ये आंबा, वड, पिंपळ, बदाम आदी वृक्षांचा समावेश आहे. केवळ वृक्ष लागवड न करता त्यासाठी कुंपणही केले आहे. पावसाळा कसाबसा पार पडला. आता उन्हाची तीव्रता सुरू झाली आहे. यामध्ये झाडे टिकणार नाहीत, असे गृहीत धरून सर्वांनी वृक्षालगत सलाईनची बाटली लावून ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा सुरू केला आहे. मॉर्निंगवॉकला जाणारे घरातून निघतानाच पाच ते सहा लिटरच्या कॅनमध्ये पाणी घेऊन जातात. आपआपल्या वृक्षाभोवती असलेल्या सलाईनच्या बाटलीत पाणी ओततात. त्यामुळे वृक्षांना दिवसभर ठिबक पध्दतीने पाणी पुरवठा होतो. यामुळे या वृक्षांचीही चांगली जोपासना झाली आहे. गेली वर्षभर हा ज्येष्ठ नागरिकांचा उपक्रम सुरू आहे. शासनाच्या वृक्ष लागवडीमध्ये दररोज हजारो वृक्षांची उन्हाच्या तीव्रतेत मर होत असताना, या ज्येष्ठांनी मात्र वृक्ष संगोपन कसे करावे, याचा आदर्श घालून दिला आहे.

आपण फिरावयास जाणारा परिसर प्रसन्न व हिरवागार असावा, यासाठी आपल्या सहकाऱ्यांना वृक्ष लागवडीची कल्पना सुचली. प्रत्येकाने वर्गणी काढली. आपण पाण्यासाठी सर्वांना कॅन पुरवले. वृक्ष लागवडीतूनही आपणाला आनंद मिळत आहे.
- दिलीप धामणीकर, वृक्षप्रेमी, सांगली