शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
3
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
4
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
5
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
6
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
7
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
8
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
9
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
10
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
11
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
12
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
13
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
14
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
15
ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...?
16
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वांचा झंझावात, भाजपा निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने, काँग्रेसची वाताहात  
18
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
19
पतीला भेटायला युवक घरी आला अन्...; कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
20
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेला हवे १५० कोटींचे कर्ज

By admin | Updated: May 29, 2015 00:03 IST

युनियन बँकेकडे प्रस्ताव : व्याजदरात घोडे अडले, अग्रणी बँकेशी चर्चा

सांगली : महापालिकेने ड्रेनेज व पाणी योजनेसाठी दीडशे कोटी रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव युनियन बँकेकडे दिला आहे, पण बँकेच्या व्याजदरावर कर्जाचे घोडे अडले असून, कमीत कमी व्याजदर मिळावा, यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी गुरुवारी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाशी चर्चा करण्यात आली. याला आयुक्त अजिज कारचे यांनी दुजोरा दिला. महापालिकेने सांगली, मिरज व कुपवाड या तीन शहरांसाठी स्वतंत्र ड्रेनेज योजनेचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी सांगलीचा ८२.२२ कोटी व मिरजेचा ५६.५३ कोटींच्या योजनेला नगरोत्थान योजनेतून शासनाने मंजुरी दिली. शासनाचे ५० टक्के अनुदान व महापालिकेचा ५० टक्के हिस्सा असे योजनेचे स्वरूप होते. या दोन्ही प्रकल्पांसाठी ८१ टक्के जादा दराने निविदा दाखल झाल्या होत्या. वाटाघाटीअंती ठेकेदाराने सांगलीसाठी ४९.८२ टक्के व मिरजेसाठी ५३.६८ टक्के अंतिम देकार दिला. २०१०-११ च्या दरसूचीनुसार हा दर जादा होता, पण २०१२-१३ च्या दरसूचीप्रमाणे ९.७२ टक्के जादा दराने निविदा देकार आल्याने या ठेकेदाराला काम देण्यात आले. त्यामुळे महापालिकेवर ४३ कोटी ८७ लाख रुपयांचा बोजा पडला होता. वाढीव बोजा व मूळ योजनेतील ५० टक्के हिस्सा पाहता पालिकेला सुमारे १०० कोटी रुपये ड्रेनेजसाठी उभे करावे लागणार आहेत. हीच अवस्था पाणीपुरवठा योजनांची आहे. केंद्र शासनाने ७९ कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेचा खर्च १४० कोटींच्या घरात पोहोचला आहे. या प्रकल्पासाठी ५० कोटींच्या आसपास निधीची गरज आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता प्रशासनाने दीडशे कोटींच्या कर्जाचा प्राथमिक प्रस्ताव तयार केला आहे. महापालिकेने या कर्जाचा प्रस्ताव युनियन बँकेकडे दिल्याचे आयुक्त कारचे यांनी सांगितले. बँकेच्या प्रचलित व्याजदरापेक्षा कमी व्याजाने कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी गुरुवारी अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांशी आयुक्तांनी चर्चा करून इतर बँकेच्या व्याजदराची माहिती घेतली जाणार आहे. त्यानंतर सध्याच्या व्याजदरापेक्षा कमी व्याजाने युनियन बँकेने कर्जपुरवठा करावा, यासाठी आमचा प्रयत्न राहील, असे कारचे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)कमी व्याजाचे कर्ज घेणार : कारचेमहापालिकेने विविध शासकीय योजना पूर्ण करण्यासाठी दीडशे कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव तयार केला आहे. युनियन बँकेकडे कर्जाचा प्रस्ताव दिला आहे. व्याजदराबाबत इतर बँकांची माहिती घेतली जात आहे. कमीत कमी व्याजात कर्ज उपलब्ध व्हावे, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. त्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्ती अजिज कारचे यांनी दिली.