पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:58 IST2021-09-02T04:58:30+5:302021-09-02T04:58:30+5:30

सांगली : जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बुधवारपासून शाळा सुुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच ...

More than a hundred schools started on the first day | पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक शाळा सुरू

पहिल्याच दिवशी शंभरहून अधिक शाळा सुरू

सांगली : जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी बुधवारपासून शाळा सुुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच दिवशी माध्यमिक, प्राथमिकच्या शंभरहून जास्त शाळा कोरोनाचे नियम पाळून सुुरु झाल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये पालकांसह शालेय शिक्षण समित्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित अशा दोन हजार २२७ शाळा आहेत. यापैकी शंभरहून अधिक शाळा बुधवारपासून सुरु झाल्या आहेत. यामध्ये सांगली, मिरज शहरासह ग्रामीण भागांमधील शाळांचाही समावेश आहे. शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसत होता. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तर दीड वर्षानंतर शाळेत येता आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे, तेथील शाळा मात्र सुरु झाल्या नाहीत. सांगलीसह ग्रामीण भागातील ५० शाळांनी तर शासनाच्या पूर्वीच्या आदेशानुसारच महिन्यापासून शाळा सुरु ठेवल्या आहेत. या शाळांमधील एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली नसल्याचे तेथील शिक्षकांनी सांगितले.

चौकट

कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरू : विष्णू कांबळे

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधकची सर्व काळजी घेऊन बुधवारपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. शालेय आणि ग्रामसमित्यांनाही शाळा सुरु करण्याबाबतचे अधिकार दिले आहेत. शिक्षक, मुख्याध्यापक यांनी शाळा सुरु करुन प्रशासनाच्या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.

Web Title: More than a hundred schools started on the first day