शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

‘आरोग्य’चा लाखोंचा घोटाळा

By admin | Updated: June 11, 2015 00:06 IST

लेखापरीक्षणात ठपका : कंटेनर, घंटागाडी खरेदीत ३५ लाखांचा घाटा--लूट पालिका तिजोरीची-२

शीतल पाटील - सांगली -महापालिकेचा आरोग्य विभाग विनानिविदा, नियमबाह्य कामे करण्यात तरबेज आहे. २०१२-१३ या आर्थिक वर्षात आरोग्य विभागाने घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कंटेनर, घंटागाडी, ढकलगाड्यांची विनानिविदा व नियमबाह्य खरेदी केली. त्यातून पालिकेला तब्बल ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले आहे. श्वान प्रतिबंधक लस खरेदीत गोलमाल आहे. विशिष्ट ठेकेदाराला आर्थिक लाभ देण्यासाठीच विनानिविदा खरेदीचा घाट घालण्यात आल्याचे स्पष्ट होते. महापालिकेच्या २ डिसेंबर २०१३ च्या विशेष लेखापरीक्षणात आरोग्य विभागाच्या खरेदीवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. आरोग्य विभागातील खाबूगिरी उघड करताना विनानिविदा खरेदीचा पर्दाफाश केला आहे. १३ व्या वित्त आयोगातून ४० कंटेनर, ४९ घंटागाड्या व ५५ लोखंडी ढकलगाड्या आदी ५० लाख रुपये किमतीचे साहित्य महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडून खरेदीचा ठराव करण्यात आला. महामंडळाशी केवळ एक हजार रुपयांच्या मुद्रांकावर करार झाला. वस्तुत: हा करार ४१०० रुपयांच्या मुद्रांकावर होणे अपेक्षित होते. त्यात साहित्य खरेदी विनानिविदा केली. निविदा प्रक्रिया राबविली असती, तर स्पर्धात्मक दर प्राप्त होऊन महापालिकेला आर्थिक फायदा झाला असता. पण आरोग्य विभागाने बाजारातील साहित्याच्या दराची पडताळणी न करताच खरेदी केली. कोल्हापूर महापालिकेने खुल्या निविदा मागवून कंटेनर, घंटागाडीची खरेदी केली. त्या कंटेनरची किंमत ४८ हजार ६०० रुपये इतकी आहे, तर सांगली महापालिकेने खरेदी केलेल्या कंटेनरची किंमत ८४ हजार आहे. दोन्ही महापालिकेच्या कंटेनर खरेदीची तुलना करता, सांगली महापालिकेने ३५ हजार ४०० रुपये जादा दराने कंटेनर खरेदी केली. त्यातून पालिकेला १४ लाख २४ हजार रुपयांचा फटका बसल्याचे लेखापरीक्षणात नमूद आहे. आरोग्य विभागाने कंटेनरपोटी एकदा जादा रक्कम मोजली असताना, पुन्हा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाकडूनच नव्याने ६१ कंटेनर खरेदी केले. त्यावेळीही खुल्या निविदा प्रक्रियेचा अवलंब केला नाही. विशेष म्हणजे लघु उद्योग विकास महामंडळामार्फत खरेदी करावयाच्या १५ वस्तूंच्या यादीत कंटेनर, ढकलगाड्यांचा समावेश नाही. तरीही महापालिकेने त्यांच्याकडूनच साहित्य खरेदी केले. या ६१ कंटेनरपोटी महापालिकेने २१ लाख ५९ हजार ४०० रुपये जादा मोजले आहेत. औषधांच्या खरेदीतही गोलमाल केला आहे. श्वान प्रतिबंधक लस खरेदीही त्यातून सुटलेली नाही. महापालिकेने एका एजन्सीकडून २ लाख रुपये किमतीचे ७३० व्हायल खरेदीस आयुक्तांनी मान्यता दिली. एका व्हायलसाठी ३७३ रुपये दर आहे. शासननिर्णयानुसार खरेदीचे दर करार १ मेपूर्वी करणे अपेक्षित असताना, महापालिकेने पाच महिने विलंबाने म्हणजे नोव्हेंबरमध्ये दर करार केला. तोपर्यंत याच पुरवठादाराला दर करार न करता रेबीज लस पुरविण्यास मंजुरी देण्यात आली. दर करार विहित वेळेत न केल्याने महापालिकेला २९ रुपये जादा दराने व्हायल खरेदी करावा लागला. त्यातून २१ हजार १७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.हॅण्डग्लोज, गम बूटची विनानिविदा खरेदीमहापालिकेने २९९ नग लॉँग हँडल ब्रुम, एक हजार नग रबरी हॅण्डग्लोज व एक हजार नग गम बूट असे सुमारे ११ लाख रुपये किमतीचे साहित्य विनानिविदा खरेदी केले. त्यासाठी तातडीची बाब, हे कारण दिले गेले. पण ठेकेदाराला तीन महिने विलंबाने वर्कआॅर्डर देण्यात आली. साहित्य पुरवठ्याची मुदत ३० दिवसांची असताना ठेकेदाराने ५४ दिवस विलंबाने साहित्याचा पुरवठा केला. या खरेदीत सुमारे पाच महिन्यांचा कालावधी गेला. मग ही बाब तातडीची कशी? असा सवाल उपस्थित करीत, विशिष्ट ठेकेदारास आर्थिक लाभ देण्यासाठी विनानिविदा साहित्य खरेदी केल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी आरोग्य विभागावर ठेवला आहे.