शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष निधी देणार

By admin | Updated: October 1, 2015 23:16 IST

प्रभाकर देशमुख : विट्यात नियोजन बैठक; राज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

विटा : दुष्काळी खानापूर, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यात सुरू असलेले अग्रणी नदी पुनरुज्जीवनाचे काम अत्यंत चांगले झाले असून, ते राज्यात एक आदर्श मॉडेल व पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारूपास येईल असे सांगून, अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी शासनाकडून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत, पुनर्वसन, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी दिली.विटा येथे अग्रणी नदी पुनरुज्जीवन कामाच्या पाहणीनंतर आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत सचिव देशमुख बोलत होते. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे, प्रांताधिकारी सचिन इथापे, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले, कवठेमहांकाळचे तहसीलदार सचिन डोंगरे, भाई संपतराव पवार, विवेक गुळवणी, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंतराव कवडे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत डुबल, डी. डी. कांबळे उपस्थित होते.देशमुख म्हणाले, दुष्काळी भागासाठी शाश्वत पाणी उपलब्ध झाले पाहिजे. राज्य शासनाने सुमारे पाच हजार गावे जलयुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने बंधारे दुरूस्त करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी पाणलोट कार्यक्रम प्रभावीपणे राबविले पाहिजेत. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. राज्यात सध्या लोकसहभागातून २४० कामे उभी राहिली आहेत. अग्रणी पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून लोकसहभागातून प्रभावी कामे होतात, असे सांगितले. यावेळी आ. अनिल बाबर, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनीही मते मांडली. (वार्ताहर)आ. अनिल बाबर यांनी, शासनाने शेततळी प्लॅस्टिक कागदासह मंजूर करण्याबाबत व रोहयो विहिरीसाठी असलेली ५०० मीटर अंतराची अट शिथिल करण्याबाबत सचिव प्रभाकर देशमुख यांनी शासनस्तरावर प्रयत्न करावेत, तसेच रोहयो विहिरीच्या लाभार्थींना वीज कनेक्शन तातडीने कशी मिळतील हे पाहावे, अशी सूचना केली.कामाचे कौतुकच नाही!अग्रणी पुनरुज्जीवन कामासाठी सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यातून जाधववाडी परिसरात कामे झाली. तेथील लाभार्थ्यांनी आम्ही केलेल्या कामांचे काहीच कौतुक केले नाही. प्रशासनानेही त्याची दखलही घेतली नाही, अशी नाराजी विवेक गुळवणी यांनी व्यक्त केली.