शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदीमुळे उद्योगांची कच्च्या मालाची पुरवठा साखळी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

उद्योजकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी रमेश आरवाडे, शरद नलवडे, नाना ...

उद्योजकांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन दिले. यावेळी रमेश आरवाडे, शरद नलवडे, नाना कांबळे उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : लाॅकडाऊनमध्ये बाजारपेठा बंद झाल्याने उद्योगांचा कच्च्या मालाचा पुरवठा बंद झाला आहे. कारखाने सुरु, पण उत्पादन नाही, अशी विचित्र कोंडी झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या पुरवठादारांना व्यवसायाला परवानगीची मागणी उद्योजकांनी केली आहे. भाजपच्या उद्योग आघाडीतर्फे आमदार सुधीर गाडगीळ, शरद नलवडे, रमेश आरवाडे व नाना कांबळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

उद्योजकांनी सांगितले की, बाजारपेठांसाठीची सरकारची नियमावली उद्योजक व व्यापाऱ्यांची सत्वपरीक्षा पाहणारी ठरत आहे. कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी आहे, कामगारांनाही प्रवासाला आडकाठी नाही, पण कारखान्यांना कच्चा माल मिळत नाही, अशी विचित्र स्थिती आहे. जिल्ह्यातील कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगळुरू तसेच कोल्हापूर येथून होतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदीने कच्चा माल पुरवणाऱ्या एजन्सी बंद आहेत. कारखान्यांतील उत्पादनांसाठी हार्डवेअर, विद्युत उपकरणे, ऑईल, यंत्रांचे सुटे भाग, हत्यारे यांचा पुरवठा थांबला आहे.

उद्योजकांनी सांगितले की, या पुरवठादारांसाठीचे निर्बंधसुध्दा उद्योगांना अनुकूल असावेत. पुरवठासाखळी खंडित होऊ नये, याची काळजी घेतली पाहिजे. हे व्यवसाय आणि उद्योग परस्परांवर अवलंबून असल्याची दखल न घेताच शासनाने सरसकट टाळेबंदी जाहीर केली. उद्योग सुरु ठेवण्यास सांगताना पुरवठासाखळी मात्र बंद ठेवली. कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीकडे कानाडोळा केला. सरकारच्या धोरणांमुळे उद्योग व व्यवसाय मोडकळीस येणार आहे.

कारखान्यांतील सर्रास मजूर परप्रांतीय आहेत. व्यवसाय बंद झाल्यास त्यांची उपासमार होईल. ते गावाकडे निघून गेल्यास पुन्हा परतणार नाहीत. त्यामुळे उद्योगांसाठी सरकारचे धोरण जीवघेणे ठरत आहे.

चौकट

एमआयडीसीत लसीकरण सुरु करा

उद्योजकांनी मागणी केली, अैाद्योगिक वसाहतीत कामगारांसाठी कोरोनाचे लसीकरण उपलब्ध करुन द्यावे. उद्योग सुरु असल्याने मोठ्या संख्येने कामगार वसाहतीत येत आहेत. त्यांच्यासाठी प्रशासनाने एकत्रित लसीकरणाची सोय करावी.