शिक्षण विभागातील पेंडन्सी निकाली काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST2021-03-05T04:25:48+5:302021-03-05T04:25:48+5:30

फोटो ओळी : प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल विष्णू कांबळे यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी ...

Let's get rid of the pendency in the education department | शिक्षण विभागातील पेंडन्सी निकाली काढू

शिक्षण विभागातील पेंडन्सी निकाली काढू

फोटो ओळी : प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल विष्णू कांबळे यांचा शिक्षक संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अरुण पाटील, संजीवनी जाधव, मुरलीधर दोडके उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शिक्षण विभागातील पेंडन्सी कमी करून शिक्षकांची रखडलेली कामे वेळेत करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी गुरुवारी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. प्राथमिक शिक्षणाधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल कांबळे यांचा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक संघाच्यावतीने प्रलंबित प्रश्न मांडण्यात आले. यावेळी कांबळे म्हणाले की, टेबलावर फायलींचा ढिगारा दिसणार नाही. प्राथमिक शिक्षकांचे वेतन वेळेत देण्याबरोबरच विषय शिक्षकांची वेतनश्रेणी, विषय शिक्षकांची पदावनती या विषयावर ठोस निर्णय घेतले जातील. विस्ताराधिकारी व वरिष्ठ मुख्याध्यापक पदाची पदोन्नतीची प्रक्रिया या महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी उपशिक्षणाधिकारी महेश धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस अविनाश गुरव, अरुण पाटील, संजीवनी जाधव, मुरलीधर दोडके, संतोष जगताप, शब्बीर तांबोळी, तानाजी कोडग, धनाजी घाडगे, शिवरुद्र वठारे उपस्थित होते.

Web Title: Let's get rid of the pendency in the education department